Sunday, May 5, 2024
घरमानिनीReligiousChaturmas 2023 : चातुर्मासात चुकूनही करु नये 'या' पदार्थांचे सेवन

Chaturmas 2023 : चातुर्मासात चुकूनही करु नये ‘या’ पदार्थांचे सेवन

Subscribe

हिंदू धर्मात चातुर्मासाला महत्त्वपूर्ण मानले जाते. चातुर्मासाच्या काळात भगवान विष्णूंची पूजा-आराधना करणं अधिक महत्वपूर्ण मानले जाते. चातुर्मास म्हणजे 4 महिने श्री विष्णू योगनिद्रेत जातात. या काळात कोणतेही मांगलिक कार्य, जावळ, गृह प्रवेश यांसारखे कार्य करण्यास वर्ज्य मानले जाते. हा चातुर्मास देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशीपासून सुरु होतो यावेळी भगवान विष्णू योग निद्रेत जातात. तसेच चार महिन्याचा काळ पूर्ण झाल्यावर देवउठनी एकादशीला म्हणजेच कार्तिक एकादशीला भगवान विष्णू योग निद्रेतून जागे होतात. मात्र, यंदा चातुर्मासाचा काळ 4 महिने नसून 5 महिने असणार आहे.

असं म्हणतात की, चातुर्मासाच्या काळात विष्णू भक्त त्यांची आराधना करतात. या काळात काही महत्त्वाच्या नियमांचे पालन देखील केले जाते. तसेच या काळात काही पदार्थांचे सेवन करण्यास देखील मनाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

चातुर्मासात करु नये ‘या’ पदार्थांचे सेवन

  • चातुर्मासाच्या काळात हिरव्या पालेभाज्या खाणं वर्ज्य मानलं जातं. या काळात वांगी, टोमॅटो, कांदा, लसूण, मूळा देखील खाऊ नये. चातुर्मासात या गोष्टी खाणं वर्ज्य मानले जाते कारण, या काळात पावसामुळे भाज्यांमध्ये बॅक्टेरिया निर्माण होतात. ज्यामुळे आपल्या पोटा संबंधित आजार होऊ शकतात.
  • चातुर्मासात दूध, दही, ताक, लोणचे, आंबा, आवळा, फणस खाणं देखील वर्ज्य मानलं जातं.
  • या काळात मासांहार देखील खाऊ नये. या काळात शक्यतो सात्विक आहार घ्यावा.
  • सात्विक आहाराच्या सेवनाने मन शांत आणि शुद्ध राहते. ज्यामुळे आपले धार्मिक कार्यात मन लागते.

चातुर्मासात करा ‘या’ गोष्टींचे दान

चातुर्मासात दान-धर्म केल्याने व्यक्तीला त्याच्या पापांपासून मुक्ति मिळते आणि देवाच्या आर्शिवादाने सुख-समृद्धी प्राप्त होते. या काळात दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. चार्तुमासात गरीब- गरजू व्यक्तींना अन्नदान करावे. चार्तुमासात पिवळ्या वस्तूंचे दान करावे. ज्यामध्ये चणे, गूळ, तूप, पिवळे वस्त्र द्यावे.

- Advertisement -

हेही वाचा :

Chaturmas 2023 : चातुर्मासात करा ‘या’ नियमांचे पालन श्री विष्णू होतील प्रसन्न

- Advertisment -

Manini