Tuesday, April 30, 2024
घरमानिनीReligiousसतत आजारी पडताय? या 5 प्रभावी मंत्राचा करा जप

सतत आजारी पडताय? या 5 प्रभावी मंत्राचा करा जप

Subscribe

हिंदू धर्मात देवी-देवातांच्या नियमित पूजेसोबतच त्यांच्या मंत्राचं आणि स्तोत्रांचं पठण करणं महत्त्वपूर्ण मानलं जातं. मंत्र केवळ साधकाला देवासोबतच नाही तर स्वतःसोबतच देखील एकरुप करतात. वैज्ञानिकदृष्टीकोनातून देखील मंत्रांचा जप करण्याचे अनेक फायदे सांगितले जातात. अलीकडच्या धावपळीच्या काळात अनेकांना सतत कोणत्याना कोणत्यातरी आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो. अशावेळी या आजारातील त्रास कमी करण्यासाठी काही मंत्रांचे पठण करणं फायदेशीर ठरू शकते.

आरोग्य समस्या दूर करण्यासाठी प्रभावी मंत्र

  • दुर्गासप्तशती मधील मंत्र

देहि सौभाग्यमारोग्यं, देहि मे परमं सुखं।
रूपं देहि, जयं देहि, यशो देहि, द्विषो जहि।

- Advertisement -
  • गायत्री मंत्र

ऊं भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि। धियो यो न: प्रचोदयात्।

  • महामृत्यूंजय मंत्र

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनान मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥

- Advertisement -
  • धन्वंतरी मंत्र

ॐ धन्वंतराये नमः॥

  • सूर्य मंत्र

ॐ घृणि सूर्याय नम: ॥

मंत्राचा जप करण्याचे नियम

Mantra Chanting - Things to remember while Chanting Mantras

  • धार्मिक ग्रंथानुसार सकाळी किंवा संध्याकाळी वरील 5 मंत्रांपैकी एका मंत्राचा जप करावा.
  • या मंत्राचा जप करण्यापूर्वी घरातील स्वच्छ ठिकाणी बसून समोर धूप, दिप लावून या मंत्राचा जप करावा.
  • मंत्राचा जप करताना कोणताही वाईट, नकारात्मक विचार मनात आणू नये.
  • देवाचे ध्यान करुन मंत्राचा जप करावा.
  • दररोज कमीत-कमी 108 वेळा या मंत्राचा जप करावा.
  • हा मंत्र जप करण्यासाठी तुम्ही जप माळेचा वापर करु शकता.

हेही वाचा :

तुमच्या राशीनुसार हा हवा पाकिटाचा रंग

- Advertisment -

Manini