घरताज्या घडामोडीLok Sabha Election 2024 : अखेर फडणवीसांकडून हर्षवर्धन पाटलांची नाराजी दूर; म्हणाले...

Lok Sabha Election 2024 : अखेर फडणवीसांकडून हर्षवर्धन पाटलांची नाराजी दूर; म्हणाले…

Subscribe

लोकसभेचा बारामती मतदारसंघ महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेला असून, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, बारामतीत राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर झाल्याने भाजप नेते हर्षवर्धन पाटील नाराज झाले होते. अनेकदा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटलांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी नाराजीही बोलून दाखवली.

इंदापूर : लोकसभेचा बारामती मतदारसंघ महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेला असून, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, बारामतीत राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर झाल्याने भाजप नेते हर्षवर्धन पाटील नाराज झाले होते. अनेकदा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटलांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी नाराजीही बोलून दाखवली. अखेर ही नाराजी दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज इंदापुरात हर्षवर्धन पाटलांच्या घरी दाखल झाले होते. यावेळी फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधत तिन्ही पक्षातील समन्वय योग्यरित्या साधला जात असल्याचे सांगितले. (Lok Sabha Elections 2024 DCM Devendra Fadnavis Talk With Harshavardhan Patil In Indapur)

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“आम्ही तीन पक्ष एकत्र आलो आहोत. याआधी राष्ट्रवादी काँग्रेससोबत आमची अनेकदा लढत झालेली आहे. त्यामुळे समन्वय साधावा लागत असून तो समन्वय साधण्यात आमचा प्रयत्न सुरू आहे. पण मी निश्चितपणे सांगीन की, अतिशय चांगला समन्वय साधला जातो आहे. कायकर्ते आणि नेते एकत्र काम करण्याच्या मानसिकतेत आले आहेत. सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळत आहेत. त्यामुळे ही निवडणूक आम्ही एकत्रीतपणे लढवू असा मला विश्वास आहे”, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

- Advertisement -

“कार्यकर्ता हा सैनिक असून, सैनिकाचे एकच लक्ष असते की, आपल्या सेनापती करता आपल्याला लढायचे आहे. तसेच, कार्यकर्त्यांना दिशा दाखवण्याचे काम सेनापतीचे असते. त्यामुळे त्यांनी जी भावना व्यक्त केली. त्यावरून आम्ही त्यांना नीट समजून सांगू. त्यांचे सेनापतीही त्यांना नीट समजवतील. सगळ्यांना न्याय मिळेल अशी व्यवस्थाही आम्ही येत्या काळात करणार आहोत”, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : भाजपाने मनावरचा दगड बाजूला काढताच, शिंदे गटाचा ‘फेव्हिकॉल’चा जोड डळमळीत

- Advertisement -

यावेळी माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील दुष्काळग्रस्त स्थितीवरही भाष्य केलं. त्यानुसार, “आमची सर्व गावांना विनंती आहे की, आम्ही सर्व दुष्काळाचे नियोजन केलेले आहे. पाण्याचे नियोजन केलेले आहे. पिण्याचे पाणी पोहोचले पाहिजे याबाबतही नियोजन केलेले आहे. दुष्काळ पडू नये म्हणून ज्याठिकाणी गरज आहे तिकडे पाणी राखून ठेवलेले आहे. पाण्याची सगळीच गणितं आम्ही जुळवेली आहेत. त्यामुळे आता जरी निवडणुका असल्या तरी आमचे त्यावर काम सुरू आहे. त्यामुळे लोकसभेची ही निवडणूक आहे ती, पाच वर्षांतून एकदा येते. त्यामुळे लोकशाहीतील आपली संधी घालवणे हे चुकीचे ठरेल”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.


हेही वाचा – LOK SABHA ELECTIONS 2024 : …गेट वेल सून आढळराव पाटील; खासदार अमोल कोल्हे का म्हणाले असं ?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -