Saturday, May 4, 2024
घरमानिनीReligiousमीन राशीच्या व्यक्तींनी करावी ‘या’ देवतेची उपासना

मीन राशीच्या व्यक्तींनी करावी ‘या’ देवतेची उपासना

Subscribe

ज्योतिष शास्त्रात राशींना विशेष स्थान प्राप्त आहे. ज्योतिष शास्त्रात एकूण 12 राशी आहेत ज्या 27 नक्षत्रांमध्ये विभाजित केल्या जातात. जन्म नक्षत्रानुसार प्रत्येक व्यक्तीची एक रास असते. व्यक्तीच्या राशीनुसार त्याचा स्वभाव, गुण तसेच राशीचा ग्रह स्वामी सांगितला जातो. या व्यतिरिक्त प्रत्येक राशीचा एक इष्ट देव देखील असतो. इष्ट देव व्यक्तीची जन्म कुंडली आणि राशीनुसार सांगितला जातो. आज आम्ही तुम्हाला मीन राशीच्या व्यक्तींचा इष्ट देव कोणता आहे आणि त्यांनी त्या देवाची कशी आराधना करावी याबाबत सांगणार आहोत.

ज्योतिष शास्त्रातील 12 राशींपैकी बारावी मीन रास मानली जाते. या राशीचा स्वामी गुरु आहे. त्यामुळे या राशीचे व्यक्ती खूप धार्मिक आणि आशावादी असतात. या व्यक्तींचा स्वभाव शांत आणि दयाळू असतो. या व्यक्तींना नेहमी कल्पनेत जगायला आवडते. या राशीचे लोक खूप रोमँटिक आणि भावूक असतात.

- Advertisement -

मीन राशीच्या व्यक्तींचा इष्ट देव

Lord Vishnu Facts: Name, Wife, Avatars, and Lord Shiva - HindUtsav

  • मीन राशीचा स्वामी ग्रह गुरु असल्यामुळे या व्यक्तींनी नेहमी श्री विष्णूंची भक्ती करावी.
  • प्रत्येक गुरुवारी श्री विष्णूंच्या मंदिरात जावे. यावेळी प्रसाद म्हणून केळी किंवा बुंदी देखील घेऊन जावी.
  • दररोज श्री विष्णूंच्या मंत्राचा जप आणि विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे. यामुळे या दोन्ही देवतांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील.
  • गुरुवारी पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करावे.

हेही वाचा :

कुंभ राशीच्या व्यक्तींनी करावी ‘या’ देवतेची आराधना

- Advertisment -

Manini