घरमहाराष्ट्रSanjay Raut : धर्म आणि देवाचे अवडंबर माजवून..., संजय राऊत यांचा भाजपावर...

Sanjay Raut : धर्म आणि देवाचे अवडंबर माजवून…, संजय राऊत यांचा भाजपावर घणाघात

Subscribe

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युगपुरुष की विश्वपुरुष आहेत, असे प्रमाणपत्र उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मुंबईत येऊन दिले, पण या देशाला फक्त एका पुरुष नेतृत्वाची गरज आहे. जम्मू-काश्मिरात दिवसाआड जवानांचे बळी जात आहेत. मोदी देवळात जाऊन पूजेला बसले म्हणून जवानांच्या हत्या थांबलेल्या नाहीत. हजारो काश्मिरी पंडित जे हिंदू आहेत, ते आजही काश्मिरातील त्यांच्या घरी जाऊ शकलेले नाहीत. मोदींचा देव त्यांचे रक्षण करू शकत नाही. कारण धर्म आणि देवाचे अवडंबर माजवून फक्त मते मागितली जात आहेत, असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

हेही वाचा – Telangana Result : तेलंगणात काँग्रेसची विजयाच्या दिशेने वाटचाल, पण पक्षाला नेमकी भीती कशाची?

- Advertisement -

सध्या भाजपात असलेले वरुण गांधी यांनी नेमके वेगळे विचार मांडणारे भाषण केले. वरुण गांधी यांनी देशाचे खरे चित्रच त्यांच्या भाषणात मांडले. “मी भारतमातेला मानतो. मी हनुमानाचा भक्त आहे. प्रभू श्रीराम यांना मी देव मानतो, मात्र जय श्रीराम, भारतमाता की जय या केवळ घोषणा देऊन देशातील महागाई, बेरोजगारी अशा समस्या संपणार आहेत काय? देशातील प्रत्येक व्यक्ती महागाईने बेजार आहे. तरुणांना नोकरी नाही, रोजगार नाही. त्यामुळे उत्पन्न नाही. ज्या लोकांनी कर्ज काढले ते त्यांना परतफेड करता आले नाही तर मालमत्ता जप्त होईल. या सगळ्या समस्यांचा उपाय केवळ ‘जय श्रीराम’, ‘भारतमाता की जय’ नाही.” वरुण गांधी यांचे हे म्हणणे बरोबर आहे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. सामना दैनिकातील आपल्या रोखठोक सदरातून त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : निवडणूक आयोगही भाजपाच्या गाभाऱ्यात डोळे मिटून… संजय राऊतांची बोचरी टीका

- Advertisement -

उत्तराखंडमधील एका बोगद्यात 41 मजूर 18 दिवसांपासून अडकून पडले होते. तेथे त्यांच्या सुटकेसाठी मनुष्यच प्रयत्न करीत होता. कोणताही महापुरुष देवाच्या दारात ध्यानमग्न बसला म्हणून 41 मजुरांचे प्राण वाचले नाहीत. यंत्र, विज्ञान आणि मनुष्याला शक्ती लावून बोगद्यातले दगड फोडून रस्ता करावा लागला. मोदी हे मंदिरात गेले आणि भस्म, चंदन लावून बसले ते तेलंगणातील हिंदूंची मते मिळावीत म्हणून. त्यांच्या ध्यानमुद्रेस घाबरून लडाखमध्ये घुसलेले चिनी सैन्य माघार घेणार नाहीत, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.

हेही वाचा – Rajasthan Election Results 2023: राजस्थानमध्ये परंपरा कायम? प्राथमिक कलानुसार भाजपने 115 चा गाठला आकडा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -