Sunday, April 28, 2024
घरमानिनीReligiousVastu Tips : पलंगाखाली 'या' वस्तू ठेवल्याने वाढू शकतो वास्तुदोष

Vastu Tips : पलंगाखाली ‘या’ वस्तू ठेवल्याने वाढू शकतो वास्तुदोष

Subscribe

हिंदू धर्मामध्ये ज्योतिष शास्त्राप्रमाणेच वास्तु शास्त्राला देखील अत्यंत महत्वपूर्ण मानले जाते. वास्तु शास्त्रानुसार काही नियमांचे पालन केल्यास व्यक्तीच्या आयुष्यातील अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. वास्तु शास्त्रानुसार ज्या घरामध्ये नेहमी स्वच्छता असते. त्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा वास करते. वास्तु शास्त्रामध्ये घराच्या प्रवेशद्वारापासून ते घरातील बाथरुमपर्यंत अशा अनेक गोष्टीची दिशा निश्चित केली आहे. या प्रत्येक गोष्टी योग्य दिशेनुसार असल्यास त्याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात. मात्र, चुकीच्या दिशेला चुकीची गोष्ट असल्यास घरामध्ये वास्तु दोष निर्माण होतो.

आज आम्ही तुम्हाला घरातील पलंगाबाबत काही महत्वाचे नियम सांगणार आहोत. असं म्हणतात, पलंगाखाली काही नकोत्या गोष्टी ठेवल्याने देखील घरामध्ये तणाव निर्माण होतो. तसेच त्या बेडवर झोपणाऱ्या व्यक्तीला मानसिक आणि आर्थिक समस्येचा सामना करावा लागतो.

- Advertisement -

पलंगाखाली कधीही ठेवू नका ‘या’ गोष्टी

Woodway Sheesham Solid Wood Double Bed with Storage – WoodPeckerz Furniture

  • झाडू

वास्तु शास्त्रानुसार पलंगाखाली झाडू ठेवणं अशुभ मानलं जातं. पलंगाखाली झाडू ठेवल्याने मन आणि मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो. तसेच आर्थिक समस्येचा सामना करावा लागतो.

- Advertisement -
  • इलेक्ट्रॉनिक वस्तू

पलंगाखाली कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवू नये. यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. तसेच व्यक्तीच्या आयुष्यात तणाव निर्माण होतो. घरामध्ये कलह देखील निर्माण होतो.

  • लोखंड

पलंगाखाली लोखंडाच्या कोणत्याही वस्तू ठेवू नये. यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.

  • कपडे

अनेकजण पलंगाखाली वापरात नसलेले कपडे ठेवतात. मात्र, यामुळे वास्तू दोष निर्माण होतो. घरात सतत कलह सुरु राहतात.

  • चप्पल

पलंगाखाली चप्पल ठेवणं देखील अशुभ मानलं जातं. यामुळे बाहेरील नकारात्मक ऊर्जा घरात वास करते.

वास्तु शास्त्रानुसार, घरातील पलंगा खालील जागा मोकळी असावी. पलंगाखाली अनावश्यक गोष्टी ठेवल्याने नकळत अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.


हेही वाचा :

Vastu Tips : तुळशी शेजारी कधीही ठेऊ नयेत ‘या’ गोष्टी

- Advertisment -

Manini