Wednesday, January 15, 2025
HomeमानिनीRelationshipबेस्ट फ्रेंड असल्याचे हे आहेत संकेत

बेस्ट फ्रेंड असल्याचे हे आहेत संकेत

Subscribe

आयुष्यात एखादा तरी जिवाभावाचा मित्र असावा असे म्हटले जाते. कारण, चांगल्या मैत्रीमुळे तुम्हाला शेअर करण्यासाठी मित्र तर मिळतोच शिवाय मैत्रीमुळे तुमचा आत्मविश्वास आणि मानसिक आरोग्य सुधारले जाते. जिवाभावाचा बेस्ट फ्रेंड तुमचा दररोजचा ताण कमी करण्यासही मदत करतो. मैत्री दोन्ही बाजुंनी तितक्याच निष्ठेने असायला हवी, तरच ती खरी मैत्री आणि तोच तुमचा बेस्ट फ्रेंड. पण, अनेकदा मैत्री स्वार्थापोटी सुद्धा केली जाते. अशावेळी तुमचा मित्र तुमचं खरच भलं बघतो ना? त्याची मैत्री ही प्युअर फ्रेंडशिप आहे ना हे जाणून घेणे गरजेचे आहे. नाहीतर अशा नात्यात तुमचा गैरफायदा घेतला जाण्याची अधिक शक्यता असते.

बेस्ट फ्रेंड असल्याचे संकेत –

प्लॅन कॅन्सल न करणे –

मैत्रीत एकत्र वेळ घालविणे, भेटणं याला महत्व असतंच. पण, वारंवार भेटणे टाळणे हे खऱ्या मैत्रीचे लक्षण असू शकत नाही. समजा, तुम्ही तुमच्या बेस्टफ्रेंडसोबत एखादा प्लॅन आखात आखात असाल आणि तो तुमचे प्लॅन वारंवार कॅन्सल करत असेल. तर समजा तो तुमच्यासाठी वेळ काढू शकत नाही. तो तुम्हाला तितकेसे महत्व देत नाही आहे. पण जर तो तुमच्या एका कॉलवर तुम्हाला भेटण्यास तयार होत असेल तर तो तुमचा बेस्ट फ्रेंड आहे असे समजा. तुमची मैत्री ही खरी आहे.

मदत करणे –

अनेकदा मैत्रीत असे दिसून येते की, एखाद्या गोष्टीची गरज असेल तर मित्रांची भेट घेतली जाते. अशाने मैत्रीतील विश्वास कमी होऊ लागतो. पण जर तुमचा मित्र तुमच्या मदतीस धावून येत असेल किंवा तुमच्या वाईट काळात मदत करत असेल तर तो तुमचा खरा मित्र आहे असे समजा.

भावनांचे ओझे न वाटू देणे –

मैत्रीमध्ये बेस्ट फ्रेंड असणे आणि त्याला प्रत्येक गोष्टीत गृहीत धरणे योग्य नाही. प्रत्येकाचे स्वतंत्र असे विचार असू शकतात. त्यामुळे मैत्रीत एकमेकांच्या भावनांचा विचार करायला हवा. पण, भावनांचे ओझे लादले गेले नाही पाहिजे. मैत्रीत भावनांचे ओझे लादले गेल्यास नात्यात तणाव निर्माण होतो. त्यामुळे जर तुमचा बेस्ट फ्रेंड तुमच्या भावनांची कदर करत असेल तर समजा तुमची मैत्री खरी आहे.

चुका स्वीकारणे –

जेव्हा तुमचा मित्र चुकत असेल आणि तो स्वतःहून तुमची माफी मागत असेल तर हे चांगल्या मित्राचे लक्षण आहे. चुका मान्य केल्याने, प्रामाणिकपणे माफी मागितल्याने आणि सुधारणा केल्याने विश्वास अधिक दृढ होतो. मैत्रीचे बंध अधिक मजबूत होतात. खऱ्या मैत्रीचे नाते हे प्रामाणिकप्रमाणावर अधिक अवलंबून असते.

 

 

 


हेही पहा :  तुम्ही Gen Z नाही तर मग कोण आहात ?

 

Edited By – Chaitali Shinde

Manini