Corona Live Update: औरंगाबाद जिल्ह्यात दिवसभरात १९७ नव्या रुग्णांची नोंद!

Corona Live Update: औरंगाबाद जिल्ह्यात दिवसभरात १९७ नव्या रुग्णांची नोंद!

कोरोना व्हायरस लाईव्ह अपडेट

औरंगाबाद जिल्ह्यात दिवसभरात १९७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १३ हजार ५६६वर पोहोचली आहे. तसेच सध्या ३ हजार ४२२ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर आतापर्यंत ९ हजार ६८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. ३१ जुलैपर्यंत महाराष्ट्रात लॉकडाऊन असणार आहे. तसेच ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत निर्बंध शिथील करण्यासंबंधीही सूचना देण्यात आली आहे. सविस्तर वाचा 


मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ११८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ६० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे एकट्या मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ११ हजार ९६४वर पोहोचला असून यापैकी आतापर्यंत ६ हजार २४४ जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 


राज्यात गेल्या २४ तासांत ९ हजार २११ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २९८ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ६५१वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १४ हजार ४६३ जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 


राज्यात दिवसभरात २३६ पोलिसांना कोरोनाची लागण!

राज्यात मंगळवारी दिवसभरात २३६ पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून कोरोनाग्रस्त पोलिसांची संख्या आता ८ हजार ९५८ झाली आहे. त्यापैकी २९२ पोलीस कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या पोलिसांची संख्या आता ६ हजार ९६२ झाली आहे. मंगळवारी एका पोलीसाचा मृत्यू झाला असून सध्या विविध रुग्णालयात १ हजार ८९८ पोलिसांवर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या चार महिन्यांत कोरोनाची ८ हजार ९५८ पोलिसांना लागण झाली असून मंगळवारी दिवसभरात २३६ पोलिसांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते, त्यामुळे त्यांना विविध शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

२९२ पोलीस कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, त्यामुळे सध्या विविध रुग्णालयात २०८ पोलीस अधिकार्‍यांसह १ हजार ६९१ पोलिसांवर उपचार सुरू होते. मंगळवारी एका पोलीस कर्मचार्‍याचा कोरोनामुळे मृत्यू झाला, त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या आता ९८ झाली आहे. दुसरीकडे राज्यात आतापर्यंत ३२२ पोलिसांवर जमावाकडून हल्ला झाला असून त्यात ८८१ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. कोविडसंदर्भात आतापर्यंत १ लाख ८ हजार ७३१ कॉल मुख्य नियंत्रण कक्षाला प्राप्त झाले आहेत. लॉकडाऊननंतर राज्यात १ हजार ३४६ अवैध वाहतुकीचे गुन्हे दाखल झाले असून याच गुन्ह्यांत ३१ हजार ९९५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ९४ हजार ८६ वाहने जप्त केले आहेत. त्यांच्याकडून १७ कोटी २२ लाख ७९ हजार ९०४ रुपयांचा दंड वसुल केला आहे.


आज धारावीत २ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून धारावीतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २ हजार ५४५ पोहोचला आहे. यापैकी सध्या ८३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.


देशातील कोरोना रुग्ण रिकव्हर होण्याची संख्या १० लाखांच्या उंबरठ्यावर आहे. देशातील रिकव्हरी रेट ६४.५१ टक्के इतका असून मृत्यूदर २.२३ टक्के एवढा आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.


बिहारमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. येत्या १ ऑगस्टपासून पुढील १६ दिवस हे लॉकडाऊन असणार असल्याचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.


केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ४८ हजार ५१२ नव्या रूग्णांची नोंद केली गेली आहे तर ७६८ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशभरात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ लाख ३१ हजार ६६९ वर पोहोचली आहे. त्यापैकी ५ लाख ९ हजार ४४७ अॅक्टिव्ह रूग्ण असून आतापर्यंत ९ लाख ८८ हजार ३० लोकं बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत ३४ हजार १९३ जणांचा मृत्यू झाला आहे. (सविस्तर वाचा)


देशभरात २४ तासांत ४ लाखाहून अधिक कोरोना चाचण्या

जगभर पसरणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. देशात कोरोना विषाणूचा संसर्ग ज्या प्रमाणात पसरत आहे. त्या वेगाने आता रुग्णांच्या चाचण्यांमध्ये देखील वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार; देशभरात २४ तासांत ४ लाख ८ हजार ८५५ जणांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.


जगात कोरोनाचा विस्फोट!

आतापर्यंत जगभरात १ कोटी ६८ लाखाहूनही जास्त कोरोना बाधितांची नोंद केली गेली आहेत, तर मृतांचा आकडा साडेसहा लाखांच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत ६ लाख ६३ हजाराहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर या आजाराने बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या १ कोटी ४ लाखांपार झाली आहे. आतापर्यंत जगभरात ५७ लाख ७२ हजार ६०४ अॅक्टिव्ह रूग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (सविस्तर वाचा)


राज्यात वाढत्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येप्रमाणे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढताना दिसत आहे. सलग दुसऱ्या दिवशी राज्यात नव्या कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ७ हजार ११७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १० हजार ३३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच २४ तासांत २८२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख ९१ हजार ४४०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत २ लाख ३२ हजार २७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून १४ हजार १६५ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५९.३४ टक्के एवढे झाले असून मृत्यूदर ३.६२ टक्के एवढा आहे. राज्यात सध्या १ लाख ४४ हजार ६९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

First Published on: July 29, 2020 11:24 PM
Exit mobile version