घरCORONA UPDATEजगात कोरोनाचा विस्फोट! आतापर्यंत १ कोटी ६८ लाख ९२ हजारांहून अधिक बाधित...

जगात कोरोनाचा विस्फोट! आतापर्यंत १ कोटी ६८ लाख ९२ हजारांहून अधिक बाधित रूग्ण

Subscribe

'या' तीन देशात कोरोनाचा कहर

आतापर्यंत जगभरात १ कोटी ६८ लाखाहूनही जास्त कोरोना बाधितांची नोंद केली गेली आहेत, तर मृतांचा आकडा साडेसहा लाखांच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत ६ लाख ६३ हजाराहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर या आजाराने बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या १ कोटी ४ लाखांपार झाली आहे. आतापर्यंत जगभरात ५७ लाख ७२ हजार ६०४ अॅक्टिव्ह रूग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

‘या’ तीन देशात कोरोनाचा कहर

अमेरिका, भारत, ब्राझील यासारख्या देशांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. गेल्या २४ तासांत जगात २ कोटी ४७ लाख नवे रूग्ण आढळले तर ५ हजार ५५७ लोकांचा मृत्यू झाला आहे.  जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोनाचा फटका सर्वात जास्त अमेरिका, ब्राझील आणि भारत या तीन देशांना बसला आहे. अमेरिकेत आतापर्यंत ४ कोटी ४९ लाख ८ हजार ३४३ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे तर १ लाख ५२ हजारांहून अधिकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

तिसऱ्या क्रमांकावर भारत…

सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या यादीमध्ये अमेरिकेनंतर ब्राझील या देशाचा नंबर लागतो तर तिसऱ्या क्रमांकावर भारत सध्या येऊन पोहोचला आहे. ब्राझीलमध्ये सध्या ६ लाख ७४ हजार अॅक्टिव्ह रूग्ण असून आतापर्यंत ८८ हजार ६३४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकूण २ कोटी ४८ लाख ४ हजार ६४९ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे तर त्यातुलनेत भारतात एकूण १ कोटी ५३ लाख २ हजार १३५ जणांना कोरोनाचा संसर्ग आतापर्यंत झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे. तर ३४ हजार २२४ जणांनी आतापर्यंत आपला जीव कोरोनामुळे गमावला आहे. सध्या भारतात ५ लाख ९ हजारांहून अधिक रूग्ण हे कोरोनाशी सध्या लढा देत आहेत.


Corona Update: राज्यात सलग दुसऱ्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त संख्या अधिक!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -