Corona Live Update: नागपूरमध्ये ९७७ नव्या रुग्णांची नोंद

Corona Live Update: नागपूरमध्ये ९७७ नव्या रुग्णांची नोंद

लाईव्ह अपडेट

नागपूरमध्ये ९७७ नव्या रुग्णांची नोंद जगभर पसरणाऱ्या कोरोना व्हायरसचा विळखा दिवसेंदिवस वाढत असून नागपूर शहरामध्ये अधिकच घट्ट झाल्याचे दिसून येत आहे. नागपूर शहरात आज, मंगळवारी ९७७ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर २४ तासांत ३८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (सविस्तर वाचा)

मुंबईत ९१७ नव्या रुग्णांची नोंद; ४८ जणांचा मृत्यू

मुंबईमध्येही दिवसेंदिवस रूग्णांची संख्येत वाढ होताना दिसतेय तर कालच्या तुलनेत कमी म्हणजेच आज ९१७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आज ९१७ नवे कोरोना रूग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या १ लाख २५ हजार २३९ वर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे ४८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ६ हजार ८९० वर पोहोचला आहे. (सविस्तर वाचा)
राज्यात १० हजार रुग्णांनी केली कोरोनावर मात राज्यात गेल्या २४ तासांत ११ हजार ८८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आज २५६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २८ लाख ३७ हजार ५७८ नमुन्यांपैकी ५ लाख ३५ हजार ६०१ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत राज्यात १० हजार १४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ३ लाख ६८ हजार ४३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६८.७९ टक्के एवढे झाले असून सध्या मृत्यदर ३.४२ टक्के एवढा आहे. (सविस्तर वाचा)
डी. एस. कुलकर्णी यांची मुलगी अश्विनी देशपांडे यांच्या तेराव्याच्या विधीसाठी कोर्टाने डी. एस. कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी आणि मुलगा शिरीष कुलकर्णी या तिघांना काही तासांसाठी जाण्याची परवानगी दिली आहे. कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार १६ ऑगस्ट रोजी त्यांना तेराव्याचे विधी करण्यासाठी कारागृहातून सोडण्यात येणार आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. एन. राजे यांच्या कोर्टाने हा आदेश दिला आहे.
प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. (सविस्तर वाचा)
जगातील पहिली कोरोना वॅक्सिन रशियात विकसित झाल्याचा दावा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केला आहे. तसेच व्लादिमीर पुतिन यांच्या मुलीला लस दिल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. सविस्तर वाचा 
देशात १० ऑगस्टपर्यंत २ कोटी ५२ लाख ८१ हजार ८४८ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी आतापर्यंत ६ लाख ९८ हजार २९० नमुन्यांच्या चाचण्या सोमवारी झाल्या आहे, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.
सध्या देशात २८.२१ टक्के Active केसेस असून ६९.८० टक्के कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. तसेच १.९९ टक्के देशातील मृत्यूदर आहे, अशी माहिती भारत सरकारने दिली आहे.
चिंताजनक! देशातील कोरोना बळींची संख्या ४५ हजार पार! देशात कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात ५३ हजार ६०१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ८७१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या २२ लाख ६८ हजार ६७६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४५ हजार २५७ रुग्णांचा मृत्यू झाला असून २५ लाख ८३ हजार ४९० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ६ लाख ३९ हजार ९२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांनी कोरोनाची लागण झाली आहे. मध्य प्रदेशमधील इंदौरमधील रुग्णालयात रात्री दाखल करण्यात आले. याबाबतची ममाहिती त्यांच्या मुलाने दिली आहे. त्यानंतर राहत इंदौरी यांनी स्वतः देखील ट्विटकरून याबाबत माहिती दिली आहे.
दोन कॅबिनेट मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. याबाबतची माहिती पाँडिचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी दिली आहे.
जगभरातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील कोरोनाबाधितांच्या आकडा २ कोटी २ लाख ४६ हजारांहून अधिक आहे. यापैकी आतापर्यंत ७ लाख ३८ हजारांहून रुग्ण मृत्युमुखी पडले असून १ कोटी ३१ लाख ७ हजारांहून रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात सर्वाधिक कोरोनाचा फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेतील कोरोनाबाधितांचा आकडा ५२ लाख ५१ हजारांहून अधिक असून यापैकी आतापर्यंत १ लाख ६६ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Corona Update: राज्यात ९,१८१ नव्या रुग्णांची नोंद, २९३ जणांचा मृत्यू

राज्यात गेल्या २४ तासांत ८ हजार १८१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आज २९३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २७ लाख ७३ हजार ५२० नमुन्यांपैकी ५ लाख २४ हजार ५१३ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत राज्यात ६ हजार ७११ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ३ लाख ५८ हजार ४२१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सविस्तर वाचा
First Published on: August 11, 2020 11:18 AM
Exit mobile version