घरदेश-विदेशप्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचे कोरोनामुळे निधन

प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचे कोरोनामुळे निधन

Subscribe

राहत इंदौरी हे एक प्रसिद्ध कवी, शायर असून त्यांनी बॉलिवूडसाठी बरीच गाणी लिहिली आहेत

मंगळवारी प्रसिद्ध कवी राहत इंदौरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. त्यांना कोरोना विषाणूची लागणही झाली होती, मध्य प्रदेशातील इंदौर येथे १० ऑगस्ट रोजी रात्री उशिरा त्यांना अरबिंदो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राहत इंदौरी यांचा मुलगा सतलज यांनी याबाबत माहिती दिली होती, नंतर रहात इंदौरी यांनी स्वत: देखील याबद्दल ट्विट केले होते.

- Advertisement -

राहत इंदौरी यांनी मंगळवारी सकाळी ट्वीट करून म्हटले आहे की, ‘कोविडच्या लक्षणं दिसल्यानंतर काल माझी कोरोना चाचणी घेण्यात आली असून, त्याच्या रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी अरबिंदो रुग्णालयामध्ये दाखल आहे. मी लवकरात लवकर या रोगाचा पराभव करावा अशी प्रार्थना करा. यासह, त्यांनी लोकांना आवाहन केले आहे आणि म्हटले आहे की आणखी एक विनंती आहे की, मला किंवा घरातील लोकांना फोन करु नका, आपणास माझ्या तब्येतीची माहिती ट्विटर आणि फेसबुकवर मिळत राहिल.’

- Advertisement -

विशेष म्हणजे राहत इंदौरी हे एक प्रसिद्ध कवी, शायर असून त्यांनी बॉलिवूडसाठी बरीच गाणी लिहिली आहेत. राहत इंदौरी यांचे वय ७० वर्षे आहे, अशा परिस्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.


साक्षी महाराज म्हणतात, ‘मला पाकिस्तानकडून धमकी’!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -