Corona Live Update: पर्जन्य जल विभागाच्या कार्यकारी अभियंताचा कोरोनामुळे मृत्यू!

Corona Live Update: पर्जन्य जल विभागाच्या कार्यकारी अभियंताचा कोरोनामुळे मृत्यू!

कोरोना व्हायरस लाईव्ह अपडेट

पर्जन्य जल विभागाचे कार्यकारी अभियंताचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. ते ५५ वर्षांचे होते.


राज्यात २४ तासांत ८८ नवे कोरोना पॉझिटिव्ह पोलीस कर्मचारी आढळले असून एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा ४ हजार ४८वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत ४७ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती महाराष्ट्र पोलीस दलाने दिली आहे. सविस्तर वाचा 


कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत आहे. २४ तासांत १३ हजार ९२५ रुग्ण बरे झाले असून एकूण २ लाख २७ हजार ७५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट हा ५५.४९ टक्के झाला आहे. तसेच २४ तासांत १ लाख ९० हजार ७३० नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण देशभरात ६८ लाख ७ हजार २२६ नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. सविस्तर वाचा 


औरंगाबाद जिल्ह्यात काल दिवसभरात सर्वाधिक १३७ कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ३ हजार ४९६वर पोहोचला आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये ९३ पुरुष आणि ४४ महिलांचा समावेश आहे. सविस्तर वाचा 


पुणे जिल्ह्यात आतापर्यंतची सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. काल पुण्यात दिवसभरात ८२३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून १५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा संख्या १५ हजार ४वर पोहोचली. तसेच आतापर्यंत पुणे जिल्ह्यात ९ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सविस्तर वाचा 


देशात कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढताना दिसत आहे. देशात काल दिवसभरात १५ हजार ४१३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३०६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ४ लाख १० हजार ४६१वर पोहोचला असून त्यापैकी १ लाख ६९ हजार ४५१ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत २ लाख २७ हजार ७५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच देशात आतापर्यंत १३ हजार २५४ जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 


जगातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ncov2019.live या अधिकृत वेबसाईटच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत जगात ८९ लाख १४ हजार ८१५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर यापैकी ४ लाख ६६ हजार ७१८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत ४५ लाख ३२ हजार ६९६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.


काल दिवसभरात तब्बल १६० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता राज्यात मृतांचा आकडा ५ हजार ९८४ इतका झाला आहे. त्यासोबतच काल राज्यात ३ हजार ८७४ नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत. त्यामुळे राज्यातल्या एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा देखील वाढून १ लाख २८ हजार २०५ वर पोहोचला आहे. यातले ६४ हजार १५३ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून ५८ हजार ५४ अॅक्टिव्ह रुग्ण सध्या राज्यात आहेत. सविस्तर वाचा 

First Published on: June 21, 2020 4:12 PM
Exit mobile version