घरCORONA UPDATEगेल्या २४ तासांत ८८ पोलिसांना कोरोनाची लागण

गेल्या २४ तासांत ८८ पोलिसांना कोरोनाची लागण

Subscribe

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना महाराष्ट्र पोलीस दलातदेखील कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. गेल्या २४ तासात महारष्ट्र पोलीस दलातील ८८ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एका पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे महाराष्ट्र पोलीस दलातील ४,०४८ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे, तर ४७ जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. मात्र, त्यांनादेखील कोरोनाचा संसर्ग होत आहे. गेल्या २४ तासांत ८८ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा ४ हजार ४८ वर पोहोचला आहे.

- Advertisement -

देशात गेल्या २४ तासांत १५ हजार ४१३ नव्या रुग्णांची नोंद

देशात गेल्या २४ तासांत देशात सर्वाधिक १५ हजार ४१३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ३०६ जणांचा मृत्यू झाला आहेत. त्यामुळे देशांतील कोरोनाबाधितांचा आकडा ४ लाखांच्या पार गेला आहे. भारतात आतापर्यंत एकूण ४ लाख १० हजार ४६१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. यापैकी आतापर्यंत १३ हजार २५४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच सध्या १ लाख ६९ हजार ४५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत २ लाख २६ हजार ७५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -