घरCORONA UPDATEपुणेकरांची चिंता वाढली, २४ तासात ८२३ कोरोनाचे नवे रूग्ण, तर पिंपरी-चिंचवडमध्ये...

पुणेकरांची चिंता वाढली, २४ तासात ८२३ कोरोनाचे नवे रूग्ण, तर पिंपरी-चिंचवडमध्ये…

Subscribe

पिंपरी चिंचवड महापालिका इमारतीत पुन्हा एकदा नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आलीय.

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मुबंई शहरातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारी बरोबरच पुण्यात देखील कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून पुण्यात दिवसभरात ८२३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली  आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या १५ हजार ४वर पोहोचली आहे. तर १५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणेकरांची चिंता अधिक वाढली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका इमारतीत पुन्हा एकदा नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आलीय. तसेच सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना देखील प्रवेश टाळण्याची विनंती केली गेलीय. ३० जूनपर्यंत हा निर्णय घेण्यात आलाय. एक नगरसेविका, प्रभाग कार्यलयातील कर्मचारी आणि पालिका परिसरातील बँक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोना प्रादुर्भाव पालिका इमारतीत वाढू नये आणि तसेच कर्मचाऱ्यांना केवळ कोरोनाच्या अनुषंगानेच अधिकचं काम करता यावं म्हणून पालिका आयुक्तानी हे पाऊल उचललं आहे.

- Advertisement -

राज्यातही चिंता वाढली

राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असतानाच आज कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या आकड्याचा भडका उडाला आहे. आज दिवसभरात तब्बल १६० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता राज्यात मृतांचा आकडा ५ हजार ९८४ इतका झाला आहे. त्यासोबतच आज राज्यात ३ हजार ८७४ नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत. त्यामुळे राज्यातल्या एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा देखील वाढून १ लाख २८ हजार २०५ वर पोहोचला आहे. यातले ६४ हजार १५३ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून ५८ हजार ५४ अॅक्टिव्ह रुग्ण सध्या राज्यात आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५०.०४ टक्के एवढे आहे.

- Advertisement -

राज्यात १६० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून मृतांची संख्या ५९८४ वर पोहोचली आहे. राज्यातील मृत्यू दर ४.६७ टक्क्यांवर पोहोचला आहे. मृतांमध्ये मुंबई १३६, जळगाव १०, पुणे ५, सोलापूर १, औरंगाबाद ६, जालना १, बीड १ असे आहेत.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -