घरताज्या घडामोडीCoronaVirus: देशात २४ तासांत १ लाख ९० हजारांहून अधिकांच्या झाल्या चाचण्या!

CoronaVirus: देशात २४ तासांत १ लाख ९० हजारांहून अधिकांच्या झाल्या चाचण्या!

Subscribe

देशभरात कोरोना विषाणूचा फैलाव वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने कोरोना चाचणी करण्यावर सरकार अधिक भर देत आहे. मागील २४ तासांत देशात १ लाख ९० हजार ७३० नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ६८ लाख ७ हजार २२६ नमुन्यांच्या चाचण्या केल्या आहेत. तसेच मागील २४ तासांत १३ हजार ९२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाचे रुग्ण बरे झालेला आकडा २ लाख २७ हजार ७५५वर पोहोचला आहे. देशातील रिकव्हरी रेट हा ५५.४९ टक्के आहे, अशी माहिती भारत सरकारने दिली आहे.

- Advertisement -

देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्याने चार लाखांच्या टप्पा पार केला असून एकूण बाधितांचा आकडा ४ लाख १० हजार ४६१वर पोहोचला आहे. तसेच आतापर्यंत १३ हजार २५४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ लाख ६९ हजार ४५१ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. काल दिवसभरात देशात सर्वाधिक कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. २४ तासांत १५ हजार ४१३ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून ३०६ जणांचा मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत जगात ८९ लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी ४ लाख ६६ हजारांहून अधिक जण मृत्यूमुखी पडले आहेत. तसेच ४५ लाख ३७ हजारांहून अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: औरंगाबाद जिल्ह्यात काल दिवसभरात सर्वाधिक १३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -