पोल्ट्री व्यावसायिकांची पोल्ट्री कंपन्यांकडून फसवणूक कायम

पोल्ट्री व्यावसायिकांची पोल्ट्री कंपन्यांकडून फसवणूक कायम

लसीं अभावी कुक्कुटपालन व्यवसाय धोक्यात ; संसर्ग रोखण्यासाठी लस उत्पादकांना परवानगी मिळण्याची शक्यता

गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जग कोरोनाच्या गर्तेत अडकले आहे. त्यामुळे संपूर्ण जगभरात लॉकडाऊन करुन अत्यावश्यक सेवा वगळता अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले. त्यामुळे अनेक छोटे-मोठे उद्योगधंदे ठप्प झाले होते. परिणामी अनेक व्यावसायिकांसह पोल्ट्री व्यवसाय धारकांनाही याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. याशिवाय रायगड जिल्ह्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळ हे दोन्ही प्रसंग याशिवाय यापूर्वी आलेल्या तोक्ते चक्रीवादळ तसेच बर्ड फ्लू यासारख्या सर्व संकटामुळे यामध्ये पोल्ट्री व्यावसायिक मेटाकुटीला आला आहे. तरीही शासनाकडून कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळाली नाही. एकीकडे प्रशासन पोल्ट्री व्यासायिकांकडे दुर्लक्ष करीत आहे. दुसरीकडे पोल्ट्री कंपनी शेतकऱ्याची फसवणूक करत आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगावं की मरावं ? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.अशी परिस्थिती असताना स्थानिक प्रशासन आणि रायगड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी पोल्ट्री व्यवसायकडे कानडोळा करत आहेत, असे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
रायगड जिल्ह्यातील शेतकरी योद्धा कुक्कुटपालन सहकारी संस्थेच्या माध्यमातून ‘चिकन फेस्टिव्हल’ करून लोकांच्या मनातली बर्ड फ्लूची भीती घालवण्यासाठी राबिवण्यात आला होता. परंतु यामध्ये कोणत्याही शेतकऱ्यांचा फायदा झाला नाही, मात्र सगळा फायदा पोल्ट्री कंपनीला झाला. तरीसुद्धा कंपनीची अरेरावी शेतकऱ्यांनावर सुरूच आहे.पोल्ट्री कंपनीने कोणत्याही शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कंपनी जुनी स्कीम बंद करून नवीन स्कीम चालू केल्याने यामध्ये शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. कुकुचकू कंपनी शेतकऱ्यांना प्रति किलो ६ रु देण्याचे सांगते मात्र, असे कधी देत नाही फक्त कागदावर आहे प्रत्यक्षात असे घडतच नाही. शेतकऱ्यांना प्रति किलो ४.२० पैसे दिले जाते. असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
तसेच इतर कंपन्या एक ते दीड रुपये बोनस देत असतात, मात्र कुकुचकू कंपनी असे कोणत्याही प्रकारचे बोनस देत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जोपर्यंत रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत कुकुचकू कंपनीकडून पक्षी घेतले जाणार नाहीत, असे रायगड जिल्ह्याचे शेतकरी योद्धा कुक्कुटपालन सहकारी संस्थेच्या अध्यक्ष यांनी आपलं महानगरशी संवाद साधताना म्हटले आहे.
कुकुचकू कंपनीची स्कीम इतर कंपनीच्या स्कीम समतुल्य आहे. शेतकऱ्यांना आम्ही दुय्यम दर्जाचे खाद्य देत नाही. शेतकऱ्यांनी लॅबमध्ये जाऊन खाद्य चेक करावा.रायगड जिल्ह्यात आजही आमचे शेतकऱ्यांबरोबर सलोख्याचे संबध आहेत. चिक्स प्लेसमेंट चालू आहे. शेतकऱ्यांनी इतर कंपनीची स्कीम आणि खाद्याची पडताळणी करावी, जर यामध्ये कुकुचकू कंपनी कमी पडत असेल, असे निर्दशनस आल्यास नकीच विचार करू, असे कुकुचकू कंपनीचे मालक कुणाल पात्रे यांचे म्हणणे आहे.
मात्र कंपनीच्या मालकाचे म्हणणे खोटे असल्याचे रायगड जिल्हा अध्यक्ष अनिल खामकर यांनी म्हटले आहे.
कुकुचकू कंपनीचा मालक सर्व खोट बोलत आहे. शेतकऱ्यांना मॅनेजर, सुपरवायझर परस्पर भेटून आम्ही जास्त पैसे देऊ आमच्या कंपनीचे पक्षी घ्या, असे शेतकऱ्यांना जबरदस्ती करत आहेत. जिल्ह्यात कोणतेही शेतकरी कुकुचकू कंपनीचे चिक्स घेत नाही या कंपनीचे १५ ते २० दिवस फिल्ड बिल बंद आहे.
शेतकऱ्यांना पोल्ट्रीचा २० वर्षाचा अनुभव आहे त्यामुळे कोणत्या प्रकारचे खाद्य येतात ते त्यांना माहित आहे.
कुकुचकू कंपनी खाद्य दुय्यम आहे त्यामुळे पक्षाचे वजन होत नाही, तसेच कंपनीने नवीन स्कीम लागू केली आहे कोणत्याच शेतकऱ्यांना विश्वसात न घेता चालू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चा  ५००० पक्षी मागे १० ते १३ हजार नुकसान होत आहे त्यामुळे कंपनीनी १ मार्च पासूनचा गोविग चार्ज चालू ठेवावं. असे पोल्ट्री व्यावसायिका अजिंक्य पाटील याचे म्हणणे आहे.

हेही वाचा – IND vs SL : कृणाल पांड्याला कोरोनाची बाधा; भारत-श्रीलंका दुसरा टी-२० सामना लांबणीवर  

First Published on: July 27, 2021 5:36 PM
Exit mobile version