Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IND vs SL : कृणाल पांड्याला कोरोनाची बाधा; भारत-श्रीलंका दुसरा टी-२० सामना लांबणीवर

IND vs SL : कृणाल पांड्याला कोरोनाची बाधा; भारत-श्रीलंका दुसरा टी-२० सामना लांबणीवर

इतर खेळाडूंच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यास दुसरा टी-२० सामना बुधवारी खेळवला जाऊ शकेल.

Related Story

- Advertisement -

श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. भारताचा अष्टपैलू कृणाल पांड्याला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे भारत आणि श्रीलंका यांच्यात आज (मंगळवारी) होणारा दुसरा टी-२० सामना पुढे ढकलण्यात आला आहे. इतर खेळाडूंच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यास हा सामना बुधवारी खेळवला जाऊ शकेल. ‘कृणालला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे दोन्ही संघांना क्वारंटाईन व्हावे लागले आहे. त्यांची कोरोना चाचणी होत असून त्याचा अहवाल येईपर्यंत त्यांना क्वारंटाईन व्हावे लागणार आहे,’ अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेला सूत्रांनी दिली. त्यानंतर बीसीसीआयनेही ट्विट करत याबाबतची माहिती दिली.

भारताच्या श्रीलंका दौऱ्यात आता केवळ दोन टी-२० सामने शिल्लक आहेत. यापैकी एक सामना आज रंगणार होता. परंतु, हा सामना आता पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे आता पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव हेसुद्धा अडचणीत सापडू शकतील. इंग्लंडविरुद्ध आगामी पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी पृथ्वी आणि सूर्यकुमारची नुकतीच भारताच्या संघात निवड झाली. श्रीलंका दौऱ्यानंतर हे दोघे इंग्लंडला रवाना होणार होते. या दोघांचाही कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यास ते ठरल्याप्रमाणे इंग्लंडसाठी रवाना होऊ शकतील.

- Advertisement -

 

- Advertisement -