Surya Grahan 2021: वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण आणि शनि जयंती एकाच दिवशी त्यामुळे चुकूनही करू नका ‘ही’ कामं

Surya Grahan 2021: वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण आणि शनि जयंती एकाच दिवशी त्यामुळे चुकूनही करू नका ‘ही’ कामं

वर्षातील शेवटचं सूर्य ग्रहण उद्या म्हणजेच ४ डिसेंबरला सुरू होणार आहे. योगायोगाने वर्षातील शेवटचं सूर्य ग्रहण आणि शनि जयंती एकाच दिवशी आली आहे. शनि अमावस्या आणि सूर्य ग्रहण एकाच दिवशी दिसणं हा योग तब्बल १४८ वर्षांनी आला आहे. या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे भारतात सूतक पाळण्याची गरज नाही. ४ डिसेंबर दिसणारं सूर्यग्रहण हे अंटार्टिका,दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिकेत दिसणार आहे. हे सूर्य ग्रहण किती वेळ असणार त्याचप्रमाणे शनि जयंती आणि सूर्यग्रहण एकत्र आल्याने काय करावे आणि काय नाही हे देखील जाणून घ्या.

सूर्यग्रणाचा वेळ

४ डिसेंबर २०२१

२०२१मधील शेवटचे सूर्य ग्रहण सकाळी १०:५९ वाजता सुरू होईल आणि दुपारी ३:७ वाजता संपणार आहे. हे सूर्यग्रण एकूण ४ लाख ८ मनिटांचे असणार आहे.

‘या’ राशीच्या लोकांवर होणार सूर्यग्रहणाचा प्रभाव

सूर्य ग्रहण हे यावेळी वृश्चिक राशी आणि ज्येष्ठ नक्षत्रात लागणार आहे. त्यामुळे या ग्रहणामुळे अनेक राशीचे आणि नक्षत्राचे लोक प्रभावित होणार आहेत. वृश्चिक राशीच्या लोकांना सूर्य ग्रहणावेळी जास्त सावधान रहावे लागणार आहे.

 

चुकूनही करू नका ‘ही’ कामं

वरील माहितीप्रमाणे सूर्य ग्रहण आणि शनि जयंतीचा योग एकाच दिवशी आल्याने या दिवशी लोखंड,तिळाचं तेल,काळे उडिद आणि काळे कपडे खरेदी करू नसे असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे ग्रहणाच्या कालावधीत कोणतेही शुभ काम करू नये. शनि जयंतीच्या दिवशी काळ्या वस्तू दान कराव्यात. गर्वभती महिलांनी ग्रणाच्या कालावधीत घराबाहेर पडू नका.


हेही वाचा – Chanakya Niti- आयुष्यात यशस्वी होण्याचे ‘१०’ मंत्र

First Published on: December 3, 2021 10:02 AM
Exit mobile version