युतीसाठी उद्धव ठाकरे यांची मोदींसोबत एक तास चर्चा, राहुल शेवाळेंचा गौप्यस्फोट

युतीसाठी उद्धव ठाकरे यांची मोदींसोबत एक तास चर्चा, राहुल शेवाळेंचा गौप्यस्फोट

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतरही उद्धव ठाकरे युतीसाठी प्रयत्नशील होते, असा गौप्यस्फोट राहूल शेवाळ यांनी केला आहे. ते म्हणाले की, २१ जून २०२१ मध्ये उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एक तास चर्चा केली. मात्र ही चर्चा सफल होऊ शकली नाही, असं राहुल शेवाळे म्हणाले. १२ खासदारांनी आज शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यानिमित्ताने या खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत १२ खासदारांनी भूमिका जाहीर केली. (Uddhav Thackeray met Narendra Modi for alliance, says rahul shewale)

हेही वाचा – शिवसेना अजूनही एनडीएतच, राहूल शेवाळेंनी केलं स्पष्ट

राहूल शेवाळे म्हणाले की, २१ जून २०२१ मध्ये उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घेऊन तासभर युतीबाबत चर्चा केली. त्यानंतर जुलै महिन्यात अधिवेशन झालं. मात्र, या विधिमंडळ अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन करण्यात आलं. एकीकडे भाजपसोबत युतीच्या चर्चा करायच्या आणि दुसरीकडे भाजपच्या आमदारांचं निलंबन करावं ही भूमिका भाजपच्या नेतृत्त्वाला पटली नाही. त्यामुळे ते नाराज झाले. त्यामुळे युतीसाठी भाजपचे पक्षश्रेष्ठी अनुकूल नव्हते.

ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी अनेकदा युतीसाठी चर्चा केली. मात्र, भाजपला शिवसेनेकडून नंतर कोणताही पॉझिटीव्ह रिस्पॉन्स मिळाला नाही. त्यामुळे पक्षनेतृत्त्व नाराज झाले. या सर्व गोष्टींचा उल्लेख उद्धव ठाकरेंनी खासदारांच्या बैठकीतही केला. मी माझ्यापरीने युतीचा प्रयत्न केला असून आता तुम्ही प्रयत्न करा असंही उद्धव ठाकरेंनी खासदारांच्या बैठकीत सांगितलं. यावेळेस मी स्वतः चार-पाच खासदारांना शिंदेंना भेटलो. देवेंद्र फडणवीस यांनाही भेटलो. त्यांनाही यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली. मात्र तरीही भाजपाचे नेतृत्त्व नाराज होते. मी युती करायला तयार आहे पण सहाकार्य मिळत नाही, असं ठाकरेंचं म्हणणं होतं. पण तरीही भाजप नेतृत्त्व नाराज होते म्हणून ही युती होऊ शकली नाही.

हेही वाचा – शिवसेनेच्या 12 खासदारांनी स्वतंत्र गट तयार करून लोकसभाध्यक्षांना पत्र दिलं, एकनाथ शिंदेंची माहिती

एकीकडे युतीच्या चर्चा सुरू होत्या तर दुसरीकडे संजय राऊत महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत बैठका घेत होते. त्यामुळे आमच्या मनात शंका निर्माण झाली.

२०२४ ला जिंकायचं असेल तर युती पाहिजे

आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर सर्व खासदारांनी सांगितलं की आम्ही पक्षासोबतच राहू. आम्ही तेव्हाही भूमिका स्पष्ट केली की आम्ही युतीच्या माध्यमातून निवडणूक लढवली आहे. मात्र, मविआमुळे अडीच वर्षे त्रास झाला, असं उद्धव ठाकरे यांना सांगितलं. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर मी निश्चितपणे ती भूमिका स्विकारेन. त्या निर्णयाचं स्वागत करेन. हे सर्व खसदारांसमोर ठाकरेंनी सांगितलं होतं. त्या बैठकिला संजय राऊत, विनायक राऊत, अरविंद सावंत उपस्थित होते. या सर्वांसमोर पक्षश्रेष्ठीने सांगितलं की शिंदे मुख्यमंत्री झाले तर स्वागत असेल. त्यामुळे आम्हीही त्या भूमिकेशी सहमत झाले. याबाबत आमच्या चार-पाच बैठका झाल्या. २०२४ निवडणूक जिंकायची असेल तर युती व्हायला हवी अशी भूमिका मांडली होती. युतीच्या माध्यमातून आम्ही निवडून आलो आहोत, त्यामुळे लोकांचीही ती मागणी आहे, असं आम्ही ठाकरेंना सांगितलं. मात्र, येणारी निवडणूक मविआच्या माध्यमातूनच करूया अशी मागणी उद्धव ठाकरेंनी लावून धरली. मात्र, आम्ही त्या मागणीला विरोध केला. प्रत्येकाने लोकसभा मतदारसंघातील अडचणी अरविंद सावंत यांच्याकडे ठेवली.

हेही वाचा – शिवसेनेचे कार्यालय ताब्यात देण्याची शिंदे गटाची लोकसभा अध्यक्षांकडे मागणी

एनडीएत जाण्याची चांगली संधी

शिवसेनेला एनडीएत जायचं तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या एनडीएच्या उमेदवारांना पाठिंबा दिला तर आपल्याला एनडीएत जामं सोपलं होईल. राष्ट्रपती पदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा दिला. मात्र, युपीएने उपराष्ट्रपती पदासाठी मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी दिली. त्या महाराष्ट्राच्या प्रभारी होत्या तेव्हा त्यांनी शिवसेनेला खूप त्रास दिला आहे. अशावेळी त्यांना उपराष्ट्रपती पदी निवडून देणं योग्य वाटत नाही. त्यामुळे उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएच्याच उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी आम्ही ठाकरेंना केली. मात्र, संजय राऊत मविआच्या बैठकींना हजर राहतात. उपराष्ट्रपती पदासाठी कोणाला उमेदवारी द्यायची या बैठकीला राष्ट्रवादीसोबत बसतात. हे आम्हाला पटलं नाही. त्यामुळे कठोर होऊन आम्ही शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.

 

First Published on: July 19, 2022 6:54 PM
Exit mobile version