घरदेश-विदेशशिवसेनेच्या 12 खासदारांनी स्वतंत्र गट तयार करून लोकसभाध्यक्षांना पत्र दिलं, एकनाथ शिंदेंची...

शिवसेनेच्या 12 खासदारांनी स्वतंत्र गट तयार करून लोकसभाध्यक्षांना पत्र दिलं, एकनाथ शिंदेंची माहिती

Subscribe

राज्याच्या विकासाला कुठेही काही कमी पडू दिलं जाणार नाही, असं आश्वासन पंतप्रधानांनी दिलंय. त्यामुळे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे आभार मानतो, असंही एकनाथ शिंदे म्हणालेत

नवी दिल्लीः शिवसेनेच्या 12 खासदारांनी स्वतंत्र गट तयार करून लोकसभा अध्यक्षांना तसं पत्र दिलेलं आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतलीय, त्यावेळी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे बंडखोर 12 खासदार उपस्थित होते. गटनेते राहुल शेवाळे, मुख्य प्रतोद भावना गवळी, कृपाल तुमाने, सदाशिव लोखंडे, हेमंत गोडसे, प्रतापराव जाधव, संजय मंडलिक, धैर्यशील माने, हेमंत पाटील, अप्पा बारणे, राजेंद्र गावित, श्रीकांत शिंदे हे खासदार या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

जी भूमिका 50 आमदारांनी घेतली त्या भूमिकेचं समर्थन राज्यभरातून सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी केलेलेच आहे. परंतु महाराष्ट्रातील जनतेनंही त्याचं समर्थन केलेलं आहे. 2019 ला शिवसेना-भाजप युतीत निवडणूक एकत्र लढलो होतो, गेल्या महिन्याभरात आम्ही तो निर्णय घेतला. जे अडीच वर्षांपूर्वी व्हायला पाहिजे होतं, ते आता झालं आहे. आम्ही जनतेच्या मनातील सरकार स्थापन केलं, त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसादही मिळतोय. आम्ही सगळे निर्णय तातडीनं घेण्यास सुरुवात केली. पंतप्रधानांनीसुद्धा पूर्ण पाठिंबा महाराष्ट्र सरकारला दिलाय. राज्याच्या विकासाला कुठेही काही कमी पडू दिलं जाणार नाही, असं आश्वासन पंतप्रधानांनी दिलंय. त्यामुळे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे आभार मानतो, असंही एकनाथ शिंदे म्हणालेत.

- Advertisement -

जे खासदार 15 ते 22 लाख मतदारांचं जे नेतृत्व करतात, अशा खासदारांनी देखील बाळासाहेबांच्या विचारांच्या भूमिकेचं स्वागत केलेलं आहे. आणि आज त्यांनी लोकसभेच्या अध्यक्षांना तसं पत्र दिलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जे काही चांगलं काम करता येईल, त्यात हे सरकार कुठेही कमी पडणार नाही, असं आश्वासनही एकनाथ शिंदे यांनी दिलंय.

ओबीसी आरक्षणाची उद्या केस आहे. त्यासंदर्भातील सगळ्याच गोष्टींवर चर्चा हे दोन विषय महत्त्वाचे असल्यामुळे मी आज या ठिकाणी दिल्लीत आलो होतो. मी सगळ्यात आधी शिवसेनेच्या 12 खासदारांचं स्वागत करतो. त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे, जी आम्ही महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या विचारची भूमिका आहे. तसेच आमचे गुरुवर्य आनंद दिघे साहेबांचे विचार घेऊन महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचं सरकार स्थापन केल्याचंही एकनाथ शिंदेंनी अधोरेखित केलंय.

- Advertisement -

हेही वाचाः तो मॅटिनी शो आता बंद झालाय, राऊत दखल घेण्यासारखे नाहीत, एकनाथ शिंदेंचा पलटवार

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -