क्रेडिट कार्डचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का? तुमचे पैसेसुद्धा वाचतील

क्रेडिट कार्डचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का? तुमचे पैसेसुद्धा वाचतील

हल्ली प्रत्येकाकडेच क्रेडिट कार्ड असते. काहीजण क्रेडिट कार्डचा स्मार्टली वापर करतात तर काही क्रेडिट कार्डच वापरत नाहीत. त्यामुळे क्रेडिट कार्ड पासून जे फायदे मिळतात तर त्यांना मिळत नाहीत. प्रत्येक जण आपापल्या परीने क्रेडिट कार्डचा वापर करतात. क्रेडिट कार्ड नेमकं कस आणि कुठे वापरायचं हे काहींना माहित नसतं त्यामुळे त्यापासून जे लाभ मिळायला हवेत ते लोकांना मिळत नाहीत.

क्रेडिट कार्ड योग्य वेळी आणि योग्य प्रकारे वापरले तर वापरकर्त्याला त्याचे योग्य फायदे मिळतात. सध्या सणांचे दिवस आहेत. अशावेळी क्रेडिड कार्डचे फायदे जाणून घ्या आणि तुमच्या पैशांचीही बचत करा.

हे ही वाचा – शेअर बाजार गडगडला, दोन दिवसांत १७०० अंकांची घसरण

१) क्रेडिट कार्डवर लोन- कोणत्याही प्रकारचे कागदपत्र न देता तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्डच्या लिमिट नुसार लगेचच लोन मिळू शकते. या साठी कोणतीही किचकट प्रक्रिया नसते.

२) ईएमआय मध्ये रूपांतर – तुम्ही कोणत्याही प्रकारची मोठ्या रकमेची खरेदीचे रूपानंतर ईएमआय मध्ये करू शकता. आणि काही महिन्यांनंतर त्याचे पूर्ण पैसे देऊ शकता. क्रेडिट कार्डचा हा खूप महत्वाचा फायदा आहे.

हे ही वाचा –  केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा! १८ महिन्यांचा थकलेला महागाई भत्ता लवकरच मिळणार

३) कॅशबॅक आणि रिवॉर्ड – तुम्ही शॉपिंग केल्यास तुम्हाला काही रिवॉर्ड पॉइंट्स किंवा कॅशबॅक मिळतात. या रिवॉर्ड पॉइंट्सचा वापर मोफत भेटवस्तू मिळवण्यासाठी आणि इतर कोणत्याही वस्तूची किंमत कमी करण्यासाठीसुद्धा केका जातो. त्याचबरोबर कॅशबॅक हे थेट तुमच्या कार्ड खात्यात जातो.

४) एयरपोर्ट लाउंज एक्सेस – काही क्रेडिट कार्ड्स देशांतर्गत विमानतळांवर आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय विमानतळांवर सुद्धा वर्षातून एकदा किंवा अधिक वेळा विश्रामगृहात राहण्याची सुविधा तुम्हाला देतात. ट्रॅव्हल-केंद्रित क्रेडिट कार्ड आणि प्रीमियम क्रेडिट कार्ड्सवर हे खास ऑफर दिले ग्राहकांना दिले जातात.

५) वेलकम ऑफर – ज्यामध्ये बहुतांश बँक किंवा क्रेडिट कार्ड संस्था कार्डधारकांना वेगवेगळ्या प्रकारची वेलकम ऑफर देतात. या भेटवस्तू व्हाउचर, डिस्काउंट किंवा बोनस रिवॉर्ड पॉइंट्सच्या स्वरूपात ग्राहकांना मिळतात.

हे ही वाचा – पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरले

First Published on: August 23, 2022 5:11 PM
Exit mobile version