घरअर्थजगतकेंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा! १८ महिन्यांचा थकलेला महागाई भत्ता लवकरच मिळणार

केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा! १८ महिन्यांचा थकलेला महागाई भत्ता लवकरच मिळणार

Subscribe

आता केंद्रीय कर्मचाऱ्यांनी सरकारवर दबाव वाढवला असल्याने लवकरच महागाई भत्ता आणि इतर थकबाकी मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. 

नवी दिल्ली – कोरोना काळातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना महाभाई भत्ता मिळाला नव्हता. या १८ महिन्यातील महागाई भत्त्याची थकबाकी सातव्या वेतन आयोगानुसार आता लवकरच मिळणार असल्याचं समोर आलं आहे. याबाबत केंद्र सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. दरम्यान थकबाकी मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सरकावर दबाव वाढवला आहे. (DA Arrears: Central Govt Employees Will Get DA/DR Arrears Under 7th Pay Commission soon)

१८ ऑगस्ट रोजी, नॅशनल कौन्सिल ऑफ स्टाफ साइडचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी कॅबिनेट सचिव आणि राष्ट्रीय परिषदेचे (जेसीएम) अध्यक्ष यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की १ जानेवारी २०२० आणि १ जुलै २०२० आणि १ जानेवारी २०२१ पासून महागाई भत्ता/महागाई सवलतीची थकबाकी तत्काळ देण्यात यावी.

- Advertisement -

हेही वाचा – बँकांच्या खासगीकरणाचा अहवाल सादर; आरबीआय प्रतिक्रिया देत म्हणाली…

या पत्रात सर्वोच्च न्यायालयाने ८ फेब्रुवारी २०२१ रोजी दिलेला दाखला देण्यात आला आहे. आर्थिक संकटामुळे कर्मचाऱ्यांचे पगार किंवा पेन्शन तात्पुरते रोखले जाऊ शकते, परंतु परिस्थिती सुधारली की कर्मचाऱ्यांना त्यांची थकबाकी देण्यात येईल. हा कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे. त्यामुळे कायद्यानुसार त्यांना त्यांची थकबाकी मिळायला हवी, असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

- Advertisement -

कोरोनाकाळात सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना भत्ता देण्यात आला नव्हता. दरम्यान, अनेक कर्मचारी या काळात सेवानिवृत्त झाले तर अनेक निवृत्ती वेतनधारकांचा मृत्यू झाला आहे. त्यांना डीए आणि डीआर न मिळाल्याने नुकसान झालं होतं. १ जानेवारी २०२० आणि ३० जून २०२१ दरम्यान सेवानिवृत्त झाले आहेत, त्यांची ग्रॅच्युअटी आणि इतर भत्त्यांची थकबाकी कोण देणार? असा प्रश्नही या पत्राद्वारे विचारण्यात आला होता.

हेही वाचा – पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरले

JCM सदस्य श्रीकुमार म्हणतात, केंद्र सरकारने कोविड-19 च्या नावाखाली सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डीए-डीआरवर बंदी घातली होती. सर्व जवानांनी आपली जबाबदारी चोख पार पाडली. या कामगारांनी एक दिवसाचा पगार पीएम केअर फंडात जमा केला होता. तेव्हा सरकारने कामगारांचे 11 टक्के डीए देणे थांबवून 40,000 कोटी रुपयांची बचत केली होती.

दरम्यान, आता केंद्रीय कर्मचाऱ्यांनी सरकारवर दबाव वाढवला असल्याने लवकरच महागाई भत्ता आणि इतर थकबाकी मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -