अतीकची हत्या त्याच्याच नातेवाईकाने केली? अतिकच्या जवळची ‘ही’ व्यक्ती पोलिसांच्या रडारवर

अतीकची हत्या त्याच्याच नातेवाईकाने केली? अतिकच्या जवळची ‘ही’ व्यक्ती पोलिसांच्या रडारवर

Atiq Ahmed and Ashraf Murder

अतिक आणि अश्रफ यांच्या हत्येनंतर आता तपासाची सुई त्याचा जवळचा व्यक्तीकडे वळली आहे. अतिक आणि अशरफशी संबंध असलेल्या प्रत्येकाची पोलीस चौकशी करत आहेत. यामध्ये अनेक गुन्हेगार, व्यापारी, राजकारणी, व्हाईट कॉलर आणि फायनान्सर्स यांचा समावेश आहे. एकेकाळी अतिकच्या अगदी जवळचा आणि गुन्ह्यात भागीदार असलेला इम्रान हा त्यापैकीच एक. इम्रान हा अतिक अहमदचा साडू आहे. ( Atiq Ahmed And Ashraf Ahmed Murdered by his brither in law Imran UP ATS doubt )

इम्रान हा पूर्वी अतीकसोबत काम करत होता, पण मतभेद झाल्यानंतर तो आतिकपासून वेगळा झाला. मात्र, या प्रकरणातील मोठी गोष्ट म्हणजे अतिक अहमदचा मुलगा अली ज्या प्रकरणात जेलमध्ये आहे त्याची एफआयआर इमरानचा मुलगा जीशानने दाखल केला होता.

अलीकडेच अतिक अहमद यांचा मुलगा असद आणि बिल्डर मोहम्मद मुस्लिम यांचा एक ऑडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये याच इम्रानचा वारंवार उल्लेख केला जात होता. मोहम्मद मुस्लिम आणि इम्रान यांच्या भेटीमुळे अतिकचा मुलगा असद अहमदला खूप राग आला होता. यापूर्वी योगी सरकारने या गुन्हेगार इम्रानचे घरही पाडले होते. साडू आणि जुना जोडीदार असूनही अतिक अहमदला इम्रान अजिबात आवडत नव्हता.

( हेही वाचा: उपमुख्यमंत्री पहिले, मुख्यमंत्री दुसरे तर अजित पवार तिसरे…; यात मारली बाजी! )

अतिक आणि अश्रफ यांच्या हत्येपूर्वी इम्रान आणि मोहम्मद मुस्लिम यांची सतत भेट का होत होती याचा आता यूपी एसटीएफ तपास करत आहे. अतिकच्या दोन्ही शत्रूंनी एकत्र येऊन अतिक आणि अशरफची हत्या केल्याचा पोलिसांनी संशय आहे. आता मोहम्मद मुस्लिम याला एसटीएफने ताब्यात घेतले आहे. अतिकचा मुलगा असद याच्याशी तो बोलत असल्याचा एक ऑडिओ समोर आला आहे. त्यानंतर एसीटएफने ही कारवाई केली आहे. मोहम्मद मुस्लिमने अतिकची पत्नी शाहिस्ता हिला 80 लाख दिले होते.

बुधवारी प्रयागराजमधील शहागंज पोलीस ठाण्याचे एसएचओ अश्विनी कुमार यांच्यासह पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये दोन पोलिस उपनिरिक्षक आणि दोन हवालदारांचा समावेळ आहे. जबाबदारी पार पाडताना निष्काळजीपणा केल्याचे आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस आयुक्त रमित शर्मा यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त सतीश चंद्र यांच्या नेतृत्त्वाखाली तीन सदस्यीय विशेष तपास पथक स्थापन केले आहे. अन्य दोन सदस्यांमध्ये एसीपी कोतवाली सतेंद्र प्रसाद तिवारी आणि निरीक्षक ओम प्रकाश यांचा समावेश आहे.

First Published on: April 20, 2023 3:07 PM
Exit mobile version