आंतरजातीय विवाह प्रकरणी सूनेची हत्या

आंतरजातीय विवाह प्रकरणी सूनेची हत्या

हत्या

मुलाने आंतरजातीय विवाह केल्यामुळे सूनेची हत्या केल्याची धक्कादायक घटना कांदिवली परिसरात घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही हत्या सासऱ्याने केली असून हत्येनंतर महिलेचा मृतदेह नाल्यात फेकून देण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून पुढील तपास सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, कमळ राय यांच्या मुलांनी आंतरजातीय मुलीशी विवाह केला होता. त्यामुळे त्यांच्या डोक्यात राग होता. त्या रागातून त्यांनी सूनेची हत्या केली. कमळ आणि त्याच्या दोन साथीदारांनी एकत्र येत नंदिनीची हत्या केली. त्यानंतर रात्रीच्या वेळी रिक्षातून बोरिवली पश्चिम इथल्या एका नाल्यात तिचा मृतदेह फेकून दिला होता. समतानागर पोलीस स्टेशनमध्ये ११ डिसेंबर रोजी २२ वर्षीय नंदिनी राय बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांकडून घटनेची चौकशी करण्यात येत होती. यावेळी मालवणी पोलिसांच्या हद्दीतील कुजलेल्या अवस्थेत २४ डिसेंबर रोजी महिलेचा मृतदेह आढळून आला होता.

दरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास केला असता महिलेच्या वडिलांनी मृतदेहाची ओळ्ख पटवली आणि संपूर्ण प्रकाराचा खुलासा झाला. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास करत आरोपी सासरा कमळ राय (५५ वर्ष), त्याचा साथीदार कृष्णा सिंग (४५ वर्ष) आणि प्रमोद गुप्ता अशा तिघांना ताब्यात घेतलं आहे.


हेही वाचा – मनसेच्या दणक्यानंतर शाळा प्रशासन वठणीवर; वाढीव शुल्क न घेण्याचा निर्णय


 

First Published on: December 30, 2020 10:10 PM
Exit mobile version