बांगलादेशमध्ये ट्रेन आणि बसच्या धडकेत ११ जणांचा मृत्यू, तर ५ गंभीर जखमी

बांगलादेशमध्ये ट्रेन आणि बसच्या धडकेत ११ जणांचा मृत्यू, तर ५ गंभीर जखमी

बांग्लादेशमध्ये(bangladesh) मधील चटगाव जिल्ह्यात रेल्वे आणि एक मिनी बसची धडक झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत ७ विद्यार्थ्यांसोबत ११ लोकांचा जागीच मृत्यू झाला, तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. माध्यमांच्या अहवालानुसार ही दुर्घटना मीरशरई भागात शुक्रवारी घडली. विद्यार्थी आणि शिक्षकांना घेऊन ही बस ढाका येथे जात होती. त्यावेळी प्रोवती एक्सप्रेसची आणि या बसची धडक झाली आणि ही दुर्घटना घडली.

हे ही वाचा – जम्मू – काश्मीरच्या बारामुल्लामध्ये सुरक्षा दल- दहशतवाद्यांमध्ये चकमक; 2 दहशतवाद्यांना घेरण्यात यश

मीरशरई पोलीस ठाण्याचे अधिकारी कबीर हुसैन यांनी या घटनेसंदर्भात माहिती दिली त्यावेळी ते म्हणाले, की या दुर्घटनेत ज्या ११ प्रवाशांमध्ये ७ विद्यार्थी होते ज्यांचा जागीच मृत्यू झाला. यात असलेले विद्यार्थी एकाच वयाचे होते आणि त्यांच्यासोबत त्यांचे ४ शिक्षक सुद्धा होते. तर ५ जण गंभीर जखमी झाले. पोलिसांनी या ठिकाणची पाहणी केली आहे.

हे ही वाचा – पीएम मोदी, सीएम योगींच्या समर्थनामुळे संसार उद्ध्वस्त; पत्नीला दिला तिहेरी तलाक

चटगाव मंडळ कार्यालयाचे उप निर्देशक अनिसूर रहमान या दुर्घटनेबद्दल म्हणाले, या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांचे मृतदेह घटनास्थळावरून घेऊन त्यांच्य्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आले आणि जे लोक गंभीर जखमी झाले आहेत त्यांना चटगाव मेडिकल रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरु ककरण्यात आले आहेत.

हे ही वाचा – गेल्या 17 वर्षात मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीकडून 5 हजारांच्यावर खटले दाखल; केवळ 23…

हे ही वाचा – भारतात वाघांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलं; मागील १० वर्षात १०५९ वाघांचा मृत्यू

 

First Published on: July 30, 2022 4:14 PM
Exit mobile version