घरदेश-विदेशपीएम मोदी, सीएम योगींच्या समर्थनामुळे संसार उद्ध्वस्त; पत्नीला दिला तिहेरी तलाक

पीएम मोदी, सीएम योगींच्या समर्थनामुळे संसार उद्ध्वस्त; पत्नीला दिला तिहेरी तलाक

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे समर्थन केल्याने संसार उद्धवस्त झाल्याची घटना उत्तर प्रदेशातून समोर आली आहे. सरकारने तिहेरी तलाक आधीच बेकायदेशीर असल्याचे जाहीर केले आहे. असे असतानाही उत्तर प्रदेशातील मुरादाबाद शहरात तिहेरी तलाक देण्याची विचित्र घटना समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे समर्थन केल्याने पतीने तिहेरी तलाक देत घरातून बाहेर काढल्याचा आरोप पत्नीने केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे.

पीडितेने उत्तर प्रदेशच्या कोतवाली पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलीस ठाण्याच्या एसएसपींनी या प्रकरणाची चौकशी करत कारवाईचे आदेश दिले आहेत. मुरादाबादच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शना इरमने सांगितले की, डिसेंबर 2019 मध्ये तिचे  मोहम्मद नदीम नामक व्यक्तीसोबत लग्न झाले. ती कोतवाली च्या पिरजादा भागातील रहिवासी आहे.

- Advertisement -

पीडितेने तक्रारीत म्हटले की, लग्नानंतर काही दिवसांनी सासरच्या मंडळींनी तिचा छळ सुरु केला, या छळामागचे कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिलेले समर्थन. या कारणावरून सासरच्यांकडून तिचा छळ केला जात होता असा आरोप तिने केला. याप्रकरणी पीडितेने 3 मार्च रोजी एफआयआर दाखल केला. त्यानुसार पोलिसांकडून तपास सुरु आहे.

यावर एसपी सिटी अखिलेश भदौरिया म्हणाले की, पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. यात पीडितेने पती आणि सासरच्या मंडळींवर छळाचा आरोप केला आहे. या प्रकरणी कलम 376 आणि 511 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे भरणार जिओ पॉलिमर, रॅपिड हार्डनिंग काँक्रिट पद्धतीने

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -