घरदेश-विदेशभारतात वाघांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलं; मागील १० वर्षात १०५९ वाघांचा मृत्यू

भारतात वाघांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलं; मागील १० वर्षात १०५९ वाघांचा मृत्यू

Subscribe

देशातील वाघांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. सर्वाधिक वाघांचा मृत्यू झालेले राज्य मध्य प्रदेश आहे. मध्यप्रदेशात मृत्यू झालेल्या वाघांची संख्या २०२ एवढी आहे.

भारताचा(india) राष्ट्रीय प्राणी वाघ. वाघांची संख्या कमी होण्यामध्ये सध्या लक्षणीय वाढ आहोत आहे. मागील १० वर्षांत १०५९ वाघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातच वाघांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणांनी झाला. त्याचबरोबर वाघांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणांनी झाला ते कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे. तर मध्य प्रदेशात सर्वाधिक २०२ वाघांचा मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा –  Tadoba Tiger Conservation: व्याघ्रदर्शनासाठी ताडोबा जागतिक स्तरावर सर्वोत्तम पर्यटन स्थळ होण्यासाठी आराखडा सादर करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना

- Advertisement -

देशातील वाघांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यावर्षीची म्हणजेच २०२२ ची आत्तापर्यंतची मृत्युमुखी पडलेल्या वाघांची संख्या ७५ एवढी आहे. तर २०२१ साली हीच संख्या १२७ इतकी होती. देशात वाघांच्या मृत्यूच्या संख्येत मध्य प्रदेश हे राज्य आघाडीवर आहे. २०२ वाघांचा तिथे मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर वाघांचे भ्रमणमार्ग भक्कम करूनच हा प्रश्न सोवळं जाऊ शकतो असं मत तज्ज्ञांनी मांडलं आहे. त्याचबरोबर वाघांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – International Tiger Day: भारताच्या १४ व्याघ्र प्रकल्पांमध्ये जागतिक दर्जाचे संवर्धन

भारतात कोणत्या राज्यात किती वाघांचा मृत्यू(tiger death) झाला आहे त्यासंदर्भात राज्यांनी माहिती दिली. त्या माहितीनुसार, सर्वाधिक वाघांचा मृत्यू झालेले राज्य मध्य प्रदेश  आहे(२०२), दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे (१४१), कर्नाटक मध्ये (१२३), उत्तराखंड मध्ये ९९३), तामिळनाडू मध्ये (६२), आसाम मध्ये (६०), केरळ मध्ये (४५) तर उत्तर प्रदेश मध्ये (४४) वाघांचा गेल्या दहा वर्षांत मृत्यू झालं आहे. (National Tiger Conservation Authority) म्हणजेच (NTCA) द्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, भारतात सध्या 2967 वाघ आहेत. त्यापैकी तब्बल 526 वाघ हे केवळ मध्य प्रदेश राज्यात आहेत. भारतात दहा वर्षांत 10 ते 15 हजार वाघ जन्म घेतात तर दरवर्षी 1500 वाघ जन्म देतात. मात्र बदलत्या तापमानाशी जुळवून घेऊ न शकल्यामुळे त्यापैकी 70 टक्के वाघ मरण पावतात.

हे ही वाचा – International Tiger Day : जगभरातील ७० टक्के वाघ एकट्या भारतात!

कशी होते वाघांची गणना

वाघांच्या संगोपनासाठी भारतात मोठ्या स्तरावर काळ केले जाते. 3.81 लाख वर्ग किलोमीटर क्षेत्रात वाघांचा शोध घेतला जातो. त्यासाठी तब्बल 141 ठिकाणी 26,838 हजार कॅमेरे सुद्धा बसविण्यात आले आहेत. देशात आणि  राज्यात व्याघ्र संवर्धन मोहीम वेगाने काम करत असली तरी वाघांचे शत्रू ओळखून त्यावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. व्याघ्र संख्या वृद्धिंगत होत असतानाच शिकारी व अन्य काही कारणांमुळे होत असलेले वाघांचे मृत्यू नियोजनातील उणीवा दाखवीत आहेत.

हे ही वाचा – २७ वा वाढदिवस साजरा करण्यापूर्वीच देशातील सर्वात वयस्कर ‘राजा’ वाघाचा मृत्यू

मागील ५ वर्षांतील वाघांच्या मरीतुनची संख्या

2017 – 116 वाघांचा मृत्यू,  2018 – 102 वाघांचा मृत्यू,  2019 – 95 वाघांचा मृत्यू, 2020 – 106 वाघांचा मृत्यू,  2021-127 वाघांचा मृत्यू, 2022- आत्तापर्यंत 75 वाघांचा मृत्यू झाला आहे.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -