घरदेश-विदेशगेल्या 17 वर्षात मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीकडून 5 हजारांच्यावर खटले दाखल; केवळ 23...

गेल्या 17 वर्षात मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीकडून 5 हजारांच्यावर खटले दाखल; केवळ 23 प्रकरणे निकाली

Subscribe

अंमलबजावणी संचालनालयाच्या प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग कायद्यानमुळे देशात हंगामा सुरु झाला आहे. याच काययाद्याअंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांमधील किती गुन्हे आत्तापर्यंत निकाली काढण्यात आले हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. केंद्र सरकारनेच लोकसभेत यासंदर्भातील माहिती दिली आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, गेल्या 17 वर्षांत 5400 हून अधिक मनी लाँड्रिंग प्रकरणांची नोंद झाली, परंतु केवळ 23 प्रकरणं निकाली काढण्यात आली असून दोषींना शिक्षा झाली आहे. म्हणजेच या मनी लाँडरिंग प्रकरणांमध्ये शिक्षेची टक्केवारी अत्यंत कमी आहे. विशेष म्हणजे ईडीचे अधिकार, अटक करण्याचा अधिकार आणि मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याबाबत अनेक याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज महत्त्वपूर्ण निर्णय देणार आहे.

केंद्र सरकारने सोमवारी संसदेत एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले की, ईडीने गेल्या 17 वर्षांत सुमारे 5,400 मनी लाँड्रिंग प्रकरणे नोंदवली आहेत, परंतु आतापर्यंत केवळ 23 प्रकरणांमध्ये शिक्षा झाली आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

- Advertisement -

केंद्रीय मंत्र्यांनी उत्तर दिले की, 31 मार्च 2022 पर्यंत ईडीने पीएमएलए अंतर्गत 5,422 प्रकरणे नोंदवली आहेत. यामध्ये सुमारे 1 लाख 4 हजार 702 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यादरम्यान 992 प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले. या कालावधीत 869.31 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आणि 23 प्रकरणांमध्ये दोषी ठरविण्यात आले. विशेष म्हणजे पीएमएलए कायदा 2002 मध्ये तयार करण्यात आला आणि तो 1 जुलै 2005 पासून लागू करण्यात आला.

केंद्राने सांगितले की, गेल्या 10 वर्षांमध्ये ईडीने मोठ्या प्रमाणावर पीएमएलए आणि परकीय चलन उल्लंघनाची प्रकरणे नोंदवली आहेत. याशिवाय, 2021-22 आर्थिक वर्षात 1,180 मनी लाँड्रिंग प्रकरणे नोंदवण्यात आली होती, तर 5,313 विदेशी चलन उल्लंघनाची नोंद करण्यात आली होती.

- Advertisement -

कोणत्या वर्षात किती प्रकरणे नोंदवली गेली? 

2012-13 ते 2021-22 पर्यंत ईडीने मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत 3,985  गुन्हे नोंदवले. याशिवाय ईडीने FEMA  कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी 24,893 प्रकरणांची नोंद केली. ईडीच्या म्हणण्यानुसार 2012-13 आर्थिक वर्षात 221, 2013-14 मध्ये 209, 2014-15 मध्ये 178, 2015-16 मध्ये 111, 2016-17 मध्ये 200, 2017-18 मध्ये 148, 2017-18 मध्ये 148, 2019-20 मध्ये 562, 2020-21 मध्ये 981 आणि 2021-22 मध्ये 1,180 मनी लाँड्रिंगसंदर्भातील गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी किती गुन्हे दाखल?

त्याचप्रमाणे फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी 2012-13 मध्ये 1,722, 2013-14 मध्ये 915, 2014-15 मध्ये 1,516, 2016-17 मध्ये 1,993, 2016-17 मध्ये 3,627, 2017-18 मध्ये 3,360, 2018-19-19 मध्ये 3,360, 2019- 20 मध्ये  2,747, 2021-22 मध्ये 5313 गुन्हे नोंदवण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे फेमा कायदा 1999 मध्ये लागू करण्यात आला होता. 1973 च्या फेरा कायद्याच्या जागी त्याची अंमलबजावणी करण्यात आली.

केंद्रीय मंत्री त्यांच्या उत्तरात म्हणाले की, 31 मार्च 2022 पर्यंत एजन्सीने FEMA अंतर्गत एकूण 30,716 प्रकरणांची चौकशी केली आणि 8,109 प्रकरणांमध्ये नोटिसा बजावल्या. यादरम्यान, 6,472 नोटिसांवर निर्णय घेण्यात आला आणि एकूण 8,130 कोटी रुपयांच्या दंडासह 7,080 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली.


धक्कादायक! गोवंडीत एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू, कारण अस्पष्ट

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -