5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपाने खर्च केले 340 कोटी; सर्वाधिक खर्च यूपीवर

भाजपाने या वर्षीच्या सुरूवातीला पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीमध्ये 340 कोटी रूपयांचा खर्च केले. या पक्षाने सर्वाधिक खर्च यूपीमध्ये केला. तर, काँग्रेसने या राज्यांमध्ये प्रचारासाठी 194 कोटींचा खर्च केला.

दोन्ही पक्षांच्या निवडणूक खर्चाच्या अहवालानुसार, ही माहिती देण्यात आली आहे की, भाजपाने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपुर, गोवा आणि पंजाबच्या विधानसभा निवडणूकीमध्ये एकूण 340 कोटी प्रसारावर खर्च केला होता.

भाजपाच्या निवडणूक खर्चाच्या अहवालानुसार, यूपीमध्ये सर्वाधिक 221 कोटी रूपये, मणिपुरमध्ये 23 कोटी, उत्तराखंड 43.67 कोटी, पंजाबमध्ये 36 कोटींपेक्षा जास्त आणि गोव्यामध्ये 19 कोटी रूपये खर्च केले.

याचं प्रकारे काँग्रेसद्वारे जाहीर केलेल्या अहवालामध्ये सांगण्यात आलंय की, राहिलेल्या पाच राज्यांच्या निवडणूक आणि संबंधित कामांमध्ये 194 कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्च केले. काँग्रेस आणि भाजपा एक मान्यता प्राप्त पक्ष आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या पक्षांना काही विशिष्ट काळापर्यंत निवडणूक आयोगासमोर आपल्या निवडणूक खर्चाचा अहवाल दाखल करणं अनिवार्य आहे.

तसेच,  कॉर्पोरेट जगताकडूनही राजकीय पक्षांना दरवर्षी करोडोंच्या देणग्या मिळत असतात. अनेक नामंकित कंपन्या विविध पक्षांना या राजकीय देणग्या देत असतात. मात्र या देणग्या देणाऱ्यांमध्ये कॉर्पोरेट्समधील काही अज्ञात नावांचाही समावेश आहे. दरम्यान राजकारणात पारदर्शकतेसाठी काम करणाऱ्या असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) या संस्थेने नुकत्याच दिलेल्या अहवालात राजकीय निधी देणाऱ्या कंपन्यांची नावे समोर आली आहेत. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये भारती ग्रुप (भारती एंटरप्रायझेस) आणि ITC सारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे.


हेही वाचा :

आझमगड जिल्हा कारागृहात 10 कैदी आढळले एचआयव्ही पॉझिटिव्ह

First Published on: September 22, 2022 4:35 PM
Exit mobile version