तृणमूलचे ३८ आमदार भाजपच्या संपर्कात; मिथुन चक्रवर्तींनी पत्रकार परिषदेत केला दावा

तृणमूलचे ३८ आमदार भाजपच्या संपर्कात; मिथुन चक्रवर्तींनी पत्रकार परिषदेत केला दावा

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात(maharashtra politics) मोठी उलथापालथ घडते आहे. शिवसेनेचे(shivsena) आमदार पक्षापासून वेगळे आणि शिवसेने पासून विलग झालेल्या या मोठ्या गटाने भाजप सोबत हातमिळवणी करत राज्यात नवं सरकार स्थापन केलं. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल(tmc) काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी(mamata banerjee) यांनी काही दिवसांपूर्वीच कोलकाता(kolkata) येथे शाहिद दिनाच्या सभेत बोलताना म्हणाल्या, की भाजप सर्वत्र सरकार पाडण्यात व्यस्त आहे’ असा थेट आरोपच ममता बॅनर्जी यांनी भाजपवर केला. पण हेच सगळं घडत असताना तृणमूल काँग्रेसचे ३८ आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, असा दावा मिथुन चक्रवर्ती(Mithun Chakraborty) यांनी बुधवारी केला आहे.

हे ही वाचा – केंद्रीय यंत्रणांचा वापर करून तृणमूल काँग्रेस फोडता येणार नाही; ममतांचा भाजपला इशारा

गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये(bjp) दाखल झालेले बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती(Mithun Chakraborty) यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी पश्चिम बंगाल मधील तृणमूल काँग्रेसचे ३८ आमदार भाजपच्या संपर्कात असून त्यापैकी २१ आमदार थेट संपर्कात आहेत. त्याचबबरोबर मुंबईत असताना एका सकाळी शिवसेना(shivsena) आणि भाजपने महाराष्ट्रात सरकार सरकार स्थापन केल्याचे वृत्त सुद्धा वाचले, असेही ते म्हणाले.

हे ही वाचा – ‘भाजपच्या कैदेतून मुक्त व्हा’; २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ममता बॅनर्जींचे जनतेला आवाहन

याच संदर्भात तृणमूल काँग्रेसने प्रतिक्रिया देताना म्हटले, की हा डाव करून अभिनेता लोकांना मूर्ख बनावट आहे. तर मिथुन चक्रवर्ती यांनी सांगितले, की देशभरात भाजपाची एकूण १८राज्यांमध्ये सत्ता आहे. लवकरच इतर राज्यांमध्येही भाजपचा झेंडा फडकणार आहे. त्याचबरोबर ही लढाई भाजप पश्चिम बंगाल(west bengal) मध्येही सुरु ठेवणार आहे. राज्यात आजही निष्पक्ष निवडणूक झाली तर पक्ष पुढील सरकार स्थापन करू शकते. असंही मिथुन चक्रवर्ती(mithun Chakraborty)  म्हणाले.

याच पार्श्वभूमीवर तृणमूल(tmc) काँग्रेसचे खासदार शंतनू सेन यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली, त्यात ते म्हणाले की अशा प्रकारचे वक्तव्य करून लोकांना मूर्ख बनविण्याचा प्रयत्न सुरु आहे. मिथुन चक्रवर्ती यांच्या वक्तव्याचा आणि वास्तवाचा कोणताही संबंध नाही. असंही खासदार शंतनू सेन म्हणाले. २९४ सदस्य असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभेत भाजपचे9bjp0 ७५ सदस्य आहेत, तर तृणमूल काँग्रेसची सदस्य संख्या २१६ आहे.

हे ही वाचा – मला तू ओळखतेस का? असे पंतप्रधान मोदींनी विचारताच ८ वर्षीय बालिका म्हणाली…

First Published on: July 28, 2022 8:59 AM
Exit mobile version