रेल्वेत जेवणासाठी मोजावे लागणार अधिकचे पैसे

रेल्वेत जेवणासाठी मोजावे लागणार अधिकचे पैसे

लवकरच रेल्वेतील जेवण आणि चहा-नाश्त्यासाठी अधिकचे पैसे प्रवाशांना मोजावे लागणार आहेत. रेल्वे प्रशासनातील संबंधित विभागाकडून जारी केलेल्या परिपत्रकानुसार, राजधानी, शताब्दी आणि दुरांतो एक्स्प्रेसमधील चहा, नाश्ता आणि जेवण महागणार आहे. या एक्स्प्रेसची तिकीटे घेतानाच चहा, नाश्ता आणि जेवणाचे पैसेही द्यावे लागणार आहेत. या व्यतिरिक्त अन्य ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही महागाईचे चटके बसणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी चार महिन्यानंतर करण्यात येणार आहे.

असे असतील नवे दर लागू

राजधानी, दुरांतो आणि शताब्दी या एक्स्प्रेससाठी लागू करण्यात आलेल्या नव्या दरांनुसार, सेकंड एसीमधून प्रवास करणाऱ्यांना चहासाठी २० रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी चहासाठी १० रुपये मोजावे लागत होते. आता स्लीपर क्लासमधील प्रवाशांना चहासाठी १५ रुपये मोजावे लागतील. तर दुरांतोच्या स्लीपर क्लासमध्ये नाश्ता किंवा जेवण आधी ८० रुपयांना मिळत होते. त्यासाठी आता १२० रुपये मोजावे लागणार आहेत. तर संध्याकाळच्या चहासाठी २० रुपयांऐवजी ५० रुपये मोजावे लागणार आहेत. नवीन मन्यू आणि दर पुढील १५ दिवसांत अद्ययावत होतील. तर १२० दिवसांनी (चार महिने) हे नवे दर लागू होणार आहेत. त्यावेळी राजधानीच्या फर्स्ट एसी कोचमधील जेवण १४५ रुपयांऐवजी २४५ रुपये होणार आहे. सुधारित दरांमुळे फक्त प्रिमिअम ट्रेनमधील प्रवाशांनाच नव्हे, तर सर्वसामान्यांनाही चटके बसणार आहेत. नियमित मेल किंवा एक्स्प्रेस गाड्यांमध्ये शाकाहारी जेवण ८० रुपयांना मिळेल. ते सध्या ५० रुपयांना मिळते. आयआरसीटीसीकडून रेल्वे प्रवाशांना अंडा बिर्याणी ९० रुपये, तर चिकन बिर्यानी ११० रुपयांना देण्यात येईल. नियमित ट्रेनमध्ये १३० रुपयांना चिकन करी मिळणार आहे.

हेही वाचा –

सरकार शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचेच; भाजपशी आमची चर्चा नाही – शरद पवार

First Published on: November 15, 2019 12:08 PM
Exit mobile version