घरमहाराष्ट्रसरकार शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचेच; भाजपशी आमची चर्चा नाही - शरद पवार

सरकार शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचेच; भाजपशी आमची चर्चा नाही – शरद पवार

Subscribe

“राज्यातील सत्ता स्थापनेच्या दिशेने आमची चर्चा सुरु आहे. दोन दिवस किमान समान कार्यक्रमावर व्यापक चर्चा पार पडली आहे. लवकरच यातील मुद्दे दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसमोर मांडले जातील. त्यानंतर लवकरात लवकर सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु केल्या जातील. ही चर्चा फक्त शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि आघाडीच्या मित्रपक्षांमध्ये सुरु असून भाजपशी आम्ही संपर्क केलेला नाही”, असा महत्त्वपूर्ण खुलासा शरद पवार यांनी नागपूर येथील पत्रकार परिषदेत केला. अतिवृष्टीमुळे विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शरद पवार यांनी दोन दिवस नागपूर मधील दौरा केल्यानंतर नुकसान भरपाई बाबात उपाययोजना सुचवण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी सरकारस्थापनेबाबतही महत्त्वपूर्ण विधाने केली आहेत.

देवेंद्र फडणवीस ज्योतिषी आहेत का?

राज्यात भाजप वगळून कोणत्याही पक्षाचे सरकार येणार नाही, असे वक्तव्य देवेंद्र फडणीवस यांनी काल माध्यमांसमोर केले होते. आज याबाबत शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना मी आधीपासून ओळखतो, ते ज्योतिषी देखील आहेत, हे आज कळले. तसेच आतापर्यंत “मी पुन्हा येणार… मी पुन्हा येणार” एवढंच फडणवीसांचे वाक्य माझ्या डोक्यात होते. त्यामुळे ते नवीन काय बोलतात. याकडे माझं लक्ष नाही, असला टोलाही त्यांनी लगावला.

- Advertisement -

सरसकट पंचनामे करावेत

शरद पवार यांनी नागपूरमधील दहा ते बारा गावांची पाहणी केली. महत्त्वाची पिकांवर नुकसान झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. संत्रा, मोसंबी, धान, कपाशी, सोयाबिन आणि काही ठिकाणी ज्वारीवर परिणाम झालेला आहे. अभुतपूर्व अशा प्रकारचे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारमधील कृषी आणि अर्थमंत्र्यांना भेटून विदर्भातील शेतकऱ्यांना काय आणि कशी मदत करता येईल याचा पाठपुरावा करु, असे पवार म्हणाले आहेत. तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांनी पिकांसाठी कर्ज घेतले. अवकाळी पावसात पिक गेले मात्र कर्ज राहिले. त्यामुळे कर्जमाफी करुन केंद्र सरकारच्या अर्थखात्याकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देता येईल का? याचाही प्रयत्न करू असेही पवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -