गेल्या वर्षभरात बनावट नोटांचा सुळसुळाट; सर्वाधिक आढळल्या 500 रुपयांच्या नोटा

गेल्या वर्षभरात बनावट नोटांचा सुळसुळाट; सर्वाधिक आढळल्या 500 रुपयांच्या नोटा

गेल्या वर्षभरात बनावट नोटांचा (Counterfeit notes) सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढ आहे. यामध्ये सर्वाधिक 500 रुपयांच्या नोटा या बनावट असल्याची माहिती भारतीय रिझर्व बॅंकेच्या (Reserve Bank of India) अहवालातून समोर आली आहे. 500 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये 100 टक्क्यांनी वाढ झाली असून, 2000 रुपयांच्या नोटांचा वापरही कमी झाला आहे. या बनावट नोटांच्या चलनाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) देशात ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदी जाहीर केली होती. त्यावेळी नोटाबंदीचे (Demonetization) समर्थन करताना बाजारातून बनावट नोटा हद्द पार करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र सरकारचा हा दावा फोल ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

सगळ्या नोटा नव्या डिझाइनच्या

रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2020-21 या वर्षात 500 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये 101.9 टक्के वाढ झाली आहे. तसेच, 2000 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये 54.16 टक्के वाढ झाली आहे. या सगळ्या नोटा नव्या डिझाइनमधील आहेत. दरम्यान, 31 मार्च 2022 पर्यंत चलनात असलेल्या एकूण नोटांच्या मूल्यापैकी 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांचा वाटा 87.1 टक्के होता. हेच प्रमाण 31 मार्च 2021 पर्यंत 85.7 टक्के इतके होते.

आर्थिक वर्ष 31 मार्च 2022 पर्यंत 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांचा वाटा एकूण मुल्याच्या 87.1 टक्के इतका होता. तर, 31 मार्च 2021 पर्यंत हा आकडा 85.7 टक्के इतका झाला. सरत्या आर्थिक वर्षात 500 रुपयांच्या नोटांचा वाटा सर्वाधिक होता.

हेही वाचा – महाडमध्ये सापडल्या ५०० रुपयाच्या एकच नंबरच्या दोन नोटा, छबिना उत्सवात बनावट नोटा वितरण झाल्याचा संशय

गतवर्षीच्या तुलनेत 10 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये 16.4 टक्के, 20 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये 16.5 टक्के, 50 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये 28.7 टक्के, 100 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये 16.7 टक्के, 200 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये 11.7 टक्के, 500 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये 101.9 टक्के आणि 2000 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये 54.6 टक्के वाढ झाली आहे. याबाबतची माहिती रिझर्व्ह बँकेने आपल्या अहवालात नमूद केली आहे.

2000 रुपयांच्या नोटा चलनातून कमी

रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारने केलेल्या नोटा बंदीनंतर 2000 रुपयांच्या नोटा चलनात आणल्या. देशातील काळाबाजार थांबण्यासाठी सरकारने उचलेले हे पाऊल आता फोल ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील काही वर्षांपासून या 2000 रुपयांच्या नोटा चलनातून कमी होत असल्याचे सांगितले जातंय.

नोटांचा चलनातील वाटा कमी

मार्च अखेरीस 2 हजाराच्या नोटांचा चलनातील वाटा कमी झाला असून 1.6 टक्के इतकाच राहिला आहे. सध्या जवळपास 214 कोटी नोटांचा वापर सुरू आहे. या मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व मूल्याच्या नोटांची एकूण संख्या 13,053 कोटी इतकी होती. त्याआधी एक वर्षाच्या आधी हा आकडा 12,437 कोटी इतका होता.


हेही वाचा – संभाजीराजे छत्रपतींची ढाल करण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा फडणवीस आणि भाजपावर आरोप

First Published on: May 30, 2022 12:38 PM
Exit mobile version