गोदी मीडियाच्या गुलामगिरीविरुद्ध…, रवीश कुमारांनी स्पष्ट केली पुढची भूमिका

गोदी मीडियाच्या गुलामगिरीविरुद्ध…, रवीश कुमारांनी स्पष्ट केली पुढची भूमिका

मुंबई – गोदी मीडियाच्या गुलामगिरीविरुद्ध सर्वांनाच लढायचे आहे, असा चंग बांधून एनडीटीव्हीचे संपादक रवीश कुमार (Ravish Kumar) यांनी अखेर पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी ट्वीट करत त्यांनी त्यांची पुढची भूमिका स्पष्ट केली.

हेही वाचा वरिष्ठ पत्रकार रविश कुमार NDTV मधून बाहेर, बोर्डाकडून राजीनामा मंजूर

एनडीटीव्हीचे (NDTV) संस्थापक प्रणय रॉय आणि राधिका रॉय या जोडप्याने मंगळवारी आरआरपीआर होल्डिंग प्रायव्हेट लिमिडेट (RRPR Holding Private Limited) संचालकपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर सुदीप्त भट्टाचार्य, संजय पुगलिया आणि सेंथिल सिन्नैया चंगलवारायण यांना तत्काळ आरआरपीआरएचच्या मंडळावर संचालकपदावर नियुक्ती देण्यात आली आहे. अदानी समूहाने एनडीटीव्हीतील २९ टक्के स्टेक ताब्यात घेतला आहे. तर, येत्या काळात २६ टक्के स्टेक ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी ओपन ऑफर देण्यात आली आहे. २६ टक्के स्टेक अदानीच्या ताब्यात आल्यानंतर एनडीटीव्हीच्या संचालक मंडळावर अदानी समूहाचे नियंत्रण राहणार आहे. त्यामुळे संपादक रवीश कुमार यांनीही रात्री पदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या चाहत्यावर्गाने त्यांना पाठिंबा देणारे ट्विट केले. त्यामुळे रवीश कुमार यांनीही आपल्या चाहत्यांसाठी ट्विट करत त्यांची पुढची भूमिका स्पष्ट केली आहे.

हेही वाचा – NDTV अदानी समूहाच्या ताब्यात; संस्थापकांनी दिला राजीनामा, नवे मंडळही नियुक्त

प्रिय जनता,

तुम्ही माझ्यासोबत आहात. तुमचे प्रेम हीच माझी संपत्ती आहे. मी तुमच्याशी खूप काळ संवाद साधला आहे. यूट्यूब चॅनेल हा माझा नवीन मार्ग आहे. तुमच्या यूट्यूब चॅनलवर. हा माझा नवीन पत्ता आहे. गोदी मीडियाच्या गुलामगिरीविरुद्ध सर्वांनाच लढायचे आहे.

तुमचा
रवीश कुमार


NDTVमध्ये रविश कुमार अनेक कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करत होते. यामध्ये आठवड्याचा शो, रविश की रिपोर्ट, देश की बात आणि प्राईम टाईम या कार्यक्रमांचा समावेश होता. रविश कुमार हे अनेक दशकांपासून NDTVचा अविभाज्य भाग बनले होते. एक शांत व्यक्तिमत्वासाठी रविश कुमार यांची ओळख होती. तळागळातील लोकांचे प्रश्न ते मांडत होते.

पत्रकारितेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना दोन वेळा प्रतिष्ठित रामनाथ गोयंका एक्सलेन्स इन जर्नालिझम अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं आहे. तसेच आशियातील नोबेल पुरस्कार मानल्या जाणाऱ्या रॅमन मॅगेसेसे पुरस्कारानं त्यांना २०१९ मध्ये सन्मानीतही करण्यात आलं आहे. दरम्यान, NDTVचे प्रवर्तक आणि संचालक प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांनी नुकताच आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांचेही राजीनामे मंजूर करण्यात आले आहेत.

First Published on: December 1, 2022 10:58 AM
Exit mobile version