घरअर्थजगतNDTV अदानी समूहाच्या ताब्यात; संस्थापकांनी दिला राजीनामा, नवे मंडळही नियुक्त

NDTV अदानी समूहाच्या ताब्यात; संस्थापकांनी दिला राजीनामा, नवे मंडळही नियुक्त

Subscribe

२००९ आणि २०१० मध्ये अदानी समूहाच्या विश्वप्रधान कमर्शिअल प्रायव्हेट लिमिडेट कंपनीने (Vishwapradhan Commercial Private Limited ) एनडीटीव्हीला ४०३.८५ कोटी उधार दिले होते. याबदल्यात एनडीटीव्ही कंपनीतील २९.१८ टक्के शेअर्स गहाण ठेवण्यात आले होते.

नवी दिल्ली – एनडीटीव्हीचे (NDTV) संस्थापक प्रणय रॉय आणि राधिका रॉय या जोडप्याने मंगळवारी आरआरपीआर होल्डिंग प्रायव्हेट लिमिडेट (RRPR Holding Private Limited) संचालकपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर सुदीप्त भट्टाचार्य, संजय पुगलिया आणि सेंथिल सिन्नैया चंगलवारायण यांना तत्काळ आरआरपीआरएचच्या मंडळावर संचालकपदावर नियुक्ती देण्यात आली आहे. अदानी समूहाने एनडीटीव्हीतील २९ टक्के स्टेक ताब्यात घेतला आहे. तर, येत्या काळात २६ टक्के स्टेक ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी ओपन ऑफर देण्यात आली आहे. २६ टक्के स्टेक अदानीच्या ताब्यात आल्यानंतर एनडीटीव्हीच्या संचालक मंडळावर अदानी समूहाचे नियंत्रण राहणार आहे.

हेही वाचा – एनडीटीव्हीतील 29.18 टक्के हिस्सेदारी अदानी समूह करणार खरेदी

- Advertisement -

२००९ आणि २०१० मध्ये अदानी समूहाच्या विश्वप्रधान कमर्शिअल प्रायव्हेट लिमिडेट कंपनीने (Vishwapradhan Commercial Private Limited ) एनडीटीव्हीला ४०३.८५ कोटी उधार दिले होते. याबदल्यात एनडीटीव्ही कंपनीतील २९.१८ टक्के शेअर्स वॉरंट स्वरुपात देण्यात आले होते. ऑगस्टमध्ये या वॉरंटचे रुपांतर शेअर्समध्ये करण्यात आले. अदानी समूहाच्या विश्वप्रधान कमर्शिअल प्रायव्हेट लिमिडेट कंपनीने हे शेअर्स ताब्यात घेतले होते. त्यानुसार, एनडीटीव्हीमध्ये अदानी समूहाचा २९.१८ टक्के हिस्सा आहे. आता अदानी समूहाने कंपनीतील अतिरिक्त २६ टक्के शेअर्सही खरेदी करण्याचे जाहीर केले आहे.

हेही वाचा – धक्कादायक! जगभरात १.३७ लाख कर्मचाऱ्यांना नारळ, ‘या’ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कपात

- Advertisement -

अदानी समूहाकडून अधिग्रहणासाठी खुली ऑफर दिल्यानंतर संस्थापक प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांनी राजीनामा दिला. हा राजीनामा मंजूरही करण्यात आला आहे. सुदीप्त भट्टाचार्य, संजय पुगलिया आणि सैंथिल सिन्नैया चेंगलवारायण आता नवे संचालक बनले आहेत. एनडीटीव्हीने बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत, प्रमोटर आरआरपीआर होल्डिंग प्रा.लि. ने दोघांचे राजीनामे स्वीकारले आहेत. प्रणय आणि राधिका या दोघांनीही एक दिवस आधीच आपल्या शेअर्समधील ९९.५ टक्के शेअर्स अदानीची कंपनी असलेल्या विश्वप्रधान कमर्शिअल प्रा. लि.ला हस्तांतरित केले होते.

हेही वाचा – जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीने केली खोटी जाहिरात, १६ लाखांचा दंड

अदानी समूह आता अतिरिक्त २६ टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी ओपन ऑफर काढण्यात आले आहे. १.६७ कोटी शेअर्स हे ओपन ऑफर आहे. २२ नोव्हेंबर रोजी हे ओपन ऑफर सुरू झाले असून ५ डिसेंबरपर्यंत राहणार आहे. ऑफरसाठी २९४ रुपये प्रति शेअर किंमत ठरवण्यात आली आहे. आतापर्यंत ओपन ऑफरमध्ये ५३.२८ लाखापेक्षा जास्त शेअर टेंडर करण्यात आले आहे. जर हे ओपन ऑफर पूर्णपणे सबस्क्रायब केले गेले तर अदानी समूहाची एनडीटीव्हीमध्ये एकूण ५५.१८ टक्के भागीदारी असेल. याचा अर्थ एनडीटीव्हीच्या संचालक मंडळावर अदानी समूहाचे संपूर्ण नियंत्रण असेल.

नेमकं काय आहे प्रकरण?

आरआरआरआर (RRRR) होल्डिंग एनडीटीव्हीची (NDTV) प्रमोटर कंपनी आहे. विश्वप्रधान कमर्शिअल प्रायव्हेट लिमिडेट कंपनी (VCPL) ही एएमजी (AMG) मीडिया नेटवर्क लिमिटेडची उपकंपनी आहे. तर, एएमएनएल (AMNL) कंपनी अदानी इंटरप्रायजेस लिमिटेडची उपकंपनी आहे. तर, एईएल (AEL) ही अदानी समूहाची प्रमूख कंपनी आहे. याचा अर्थ VCPL चे नियंत्रण अदानी एंटरप्रायजेसकडे आहे.

एनडीटीव्हीच्या प्रमोटर कंपनीने म्हणजेच RRRR होल्डिंग प्रायव्हेट लिमिडेट कंपनीने २००९-१० मध्ये एक कर्ज फेडण्याकरता विश्वप्रधान कमर्शिअल प्रायव्हेट लिमिडेट कंपनीकडून ४०३.८५ कोटीचं कर्ज घेतलं होतं. याबदल्यात विश्वप्रधान कमर्शिअल प्रायव्हेट लिमिडेट कंपनीला आरआरआआरचे वॉरंट देण्यात आले होते. नियमांनुसार, वॉरंटला शेअर्समध्ये बदलता येतं.

याच अधिकारांतर्गत VCPLने १,९९०,००० वॉरंटला १,९९०,०० शेअर्समध्ये बदलले. याबाबत २३ ऑगस्ट रोजी नोटीस जारी करण्यात आली होती. वॉरंट एक्सरसाइज नियमांनुसार, RRRRला नोटीस दिल्याच्या दोन दिवसांत २५ ऑगस्टपर्यंत शेअर्स देणं गरेजचं होतं. मात्र, एनडीटीव्हीने २०२० च्या सेबीच्या आदेशाचा हावाला देत यात असमर्थता दर्शवली.

RRPR ही NDTVची प्रवर्तक कंपनी असल्याने आणि NDTVमध्ये 29.18% स्टेक (18,813,928 शेअर्स) असल्याने, अदानी ग्रुपला NDTVमध्ये अप्रत्यक्षपणे 29.18% स्टेक मिळाला आहे. सेबीच्या नियमांनुसार, जेव्हा एखादी कंपनी दुसर्‍या कंपनीचे 25% पेक्षा जास्त शेअर्स घेते तेव्हा तिला ओपन ऑफर द्यावी लागते.

AMNLआणि Adani Enterprisesसोबत VCPLने NDTVच्या अतिरिक्त 16,762,530 शेअर्ससाठी खुली ऑफर दिली आहे. शेअर्सची खुली ऑफर किंमत 294 रुपये आहे. आता NDTVच्या शेअरची किंमत रु.404.85 आहे. आहे. 23 ऑगस्ट रोजी अदानी समूहाने या टेकओव्हरची माहिती दिली तेव्हा शेअरची किंमत 376 रुपये होती.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -