Taj Mahal Controversy : ताजमहालच्या 22 खोल्यांच्या वादात ASI ने प्रसिद्ध केले फोटो; हे वास्तव आले समोर

Taj Mahal Controversy : ताजमहालच्या 22 खोल्यांच्या वादात ASI ने प्रसिद्ध केले फोटो; हे वास्तव आले समोर

Taj Mahal Controversy : ताजमहालच्या 22 खोल्यांच्या वादात ASI ने प्रसिद्ध केले फोटो; हे वास्तव आले समोर

ताजमहालच्या तळाघरात बंद असलेल्या 22 खोल्यांवरून सध्या वाद सुरु आहे. दरम्यान भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (ASI) या खोल्यांचे फोटो आता प्रसिद्ध केले आहेत. आग्रा एएसआयचे प्रमुख आरके पटेल यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, एएसआय वेबसाइटवर जानेवारी 2022 चे न्यूजलेटर म्हणून फोटो उपलब्ध आहेत, हे फोटो पाहण्यासाठी कोणीही त्यांच्या वेबसाइटला भेट देऊ शकतो.

आरके पटेल म्हणाले की, खोल्यांच्या आतील दुरुस्तीच्या कामाची फोटो प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्याच वेळी, पर्यटन उद्योगातील सूत्रांनी सांगितले की, या खोल्यांमध्ये काय आहे याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरू नयेत म्हणून हे फोटो सार्वजनिक करण्यात आली आहेत.

कधी काढलेत हे खोल्यांचे फोटो?

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने अलीकडेच या २२ खोल्या उघडण्यासाठी डॉ. रजनीश कुमार यांनी दाखल केलेली जनहित याचिका फेटाळून लावली होती. यानंतर हे फोटो ASI ने शेअर केले आहेत. या बंद खोल्यांमध्ये प्लास्टर, चुन्याचे पॅनिंगसह नूतनीकरणाचे काम करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या कामासाठी सुमारे 6 लाख रुपये खर्च करण्यात आले.

काय म्हणाले हायकोर्ट?

ताजमहालच्या 22 खोल्या उघडण्याच्या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने म्हटले की, तुम्ही समितीमार्फत वस्तुस्थितीचा शोध घेण्याची मागणी करत आहात, तुम्ही कोण आहात? हा तुमचा अधिकार नाही आणि ते आरटीआयच्या कक्षेत येत नाही. त्यामुळे आम्ही तुमच्या युक्तिवादाशी सहमत नाही.

‘आम्ही याचिका स्वीकारण्यास सक्षम नाही’

अलाहाबाद उच्च न्यायालयाने पुढे म्हटले होते की, खोली उघडण्याच्या मागणीसाठी कोणत्याही ऐतिहासिक संशोधनाची गरज आहे, आम्ही रिट याचिका विचारात घेण्यास सक्षम नाही, ही याचिका फेटाळली जाते. तत्पूर्वी, सुनावणीदरम्यान हायकोर्टाने याचिकाकर्त्याला चांगलेच फटकारले होते की, या विषयावर संशोधन करा, यासाठी एमए, पीएचडी करा, तुम्हाला कोणी करू देत नसेल तर आमच्याकडे या.


ACC, Ambuja Cement कंपन्या आता गौतम अदानी करणार टेकओव्हर; इतक्या कोटींत झाला सौदा

First Published on: May 16, 2022 9:56 AM
Exit mobile version