अरबी समुद्रात ‘वायू’ चक्रीवादळ; मासेमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन

अरबी समुद्रात ‘वायू’ चक्रीवादळ; मासेमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन

मुंबई पोलिसांकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

भारताच्या पूर्वमध्य आणि दक्षिण पूर्व अरबी समुद्रात ‘वायू’ चक्रीवादळ तयार झाले आहे. या वादळामुळे येत्या १२ आणि १३ जून रोजी महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यावर वाऱ्याचा वेग वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच कोकण आणि गोव्यातील काही भागात देखील वादळासह मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नयेअसे आवाहन हवामान खात्यांकडून करण्यात आले आहे.


हेही वाचा – ती वादळात जन्मली; पालकांनी नाव ठेवले ‘फनी’


वायू’ चक्रीवादळ गुजरात किनारपट्टीच्या दिशेने जाणार

भारताच्या पश्चिमकिनारपट्टीजवळ असलेल्या अरबी समुद्रात ‘वायू’ हे चक्रीवादळ तयार झाले आहे. मुंबईपासून दक्षिणनैऋत्य दिशेने ६३० किमी अंतरावर हे चक्रीवादळ स्थित असून येत्या चोवीस तासात ते आणखी तीव्र होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे वादळ गुजरात किनारपट्टीच्या दिशेने जाणार असल्यामुळे राज्यात हे वादळ धडकण्याची शक्यता नाहीपरंतु त्याच्या प्रभावामुळे येत्या दोन दिवसात वाऱ्याचा वेग वाढणार आहे. तसेच किनारपट्टीच्या भागात व्यापक परिसरात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उद्या, बुधवार १२ जून रोजी किनारपट्टीच्या जवळ समुद्र खवळलेला असणार असून १३ जून रोजी कोकण किनारपट्टीच्या उत्तर भागात समुद्र मोठ्या प्रमाणात खवळलेला असण्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मासेमारांनी बुधवार, १२ जून आणि गुरुवार १३ जून रोजी अरबी समुद्रात जाऊ नयेअसे आवाहन करण्यात आले आहे.


हेही वाचा – वादळी पावसाचा महावितरणाला झटका


 

First Published on: June 11, 2019 8:20 PM
Exit mobile version