घरमुंबईवादळी पावसाचा महावितरणाला झटका

वादळी पावसाचा महावितरणाला झटका

Subscribe

मुसळधार पावसामुळे महावितरणाची यंत्रणा बाधित झाली. काही भागांमध्ये झाड कोसळली, विजेचे खांब कोसळले, जोरदार वारा यामुळे विजेच्या तारा तुटल्या आणि वीजसेवा खंडीत झाली.

मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार या भागांना मुसळधार पावसाने झोडपले. शहापूर, डोंबिवली, कल्याण, नवी मुंबईत जोरदार वारा आणि मुसळधार पावसामुळे महावितरणाची यंत्रणा बाधित झाली. काही भागांमध्ये झाड कोसळली, विजेचे खांब कोसळले, जोरदार वारा यामुळे विजेच्या तारा तुटल्या आणि वीजसेवा खंडीत झाली.

ग्रामीण भागात विजेचे खांब पडले

ग्रामीण भागामध्ये जोरदार वाऱ्यामुळे काही ठिकाणी विजेच्या केबल तुटल्या आहेत. शहापूरमध्ये २ विजेचे खांब पडले, डोंबिवलीमध्ये २३ हजार ग्राहकांना विजेचा फटका बसला, कल्याणमध्ये १६ विजेचे खांब पडले तसंच १ डिपी स्ट्रक्चर पडले आणि उल्हासनरमध्ये ९ विजेचे खांब पडले. त्यामुळे विजसेवा खंडीत झाली होती. तर पावसामुळे विजेचे ट्रान्सफॉर्मर ट्रिप होत होते. काही ठिकाणी कंडक्टर तुटले आहेत. यामुळे वीज पुरवठा बाधित झाला आहे. ज्या ज्या ठिकाणी वज पुरवठा खंडीत झाला आहे त्या भागामध्ये महावितरणची टीम कार्यरत आहे. वीज पुरवठा पूर्ववत होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

- Advertisement -

विद्युत वाहिनीवर झाड पडले

मुंबईसह नवी मुंबईतल्या अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. पनवेल शहरामध्ये पावसामुळे मिडल क्लास सोसायटी आणि कपल बारच्या मागे विद्युत वाहिनीवर झाड पडल्यामुळे पनवेल शहराचा विद्युत पुरवठा बाधित झाला. झाड काढण्याचे काम सुरु आहे. झाड काढल्यानंतर विद्युत पुरवठा सुरळीत होईल. फिल्डवर अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती महावितरणाने दिली आहे.

हेही वाचा – 

- Advertisement -

मुंबईला पावसाने झोडपले; शॉक लागून २ मुलांचा मृत्यू

मुंबईला पावसाने झोडपले; २४ तासात अतिवृष्टीचा इशारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -