बालदिनानिमित्ताने गुगलचे खास ‘डुडल’

बालदिनानिमित्ताने गुगलचे खास ‘डुडल’

गुगलकडून चिमुकल्यांना बालदिनाच्या शुभेच्छा

गुगलवर सतत बदलणारे डुडल प्रत्येक नेटकऱ्यांच्या आकर्षणाचा बिंदू आहे. गुगलने आज बालदिनाच्या निमित्ताने एक खास डुडल तयार करुन सर्वच चिमुकल्यांना डुडलच्या माध्यमातून खास शुभेच्छा दिल्या आहेत. गुगलने आज जे खास डुडल प्रसिद्ध केले आहे ते मुंबईतील जे बी वाचा या शाळेतील पिंगळा मोरे या विद्यार्थीनींने काढले आहे. गुगल नेहमीच एका खास दिवशी डुडल तयार करुन मान्यवरांना सलाम करत असतं. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरु यांचा जन्मदिवस हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. लहान मुले आणि पंडित नेहरुंनी देशाला दिलेल्या विज्ञान – तंत्रज्ञानाची भेट या गोष्टीचा विचार करुन गुगलने खास डुडल तयार केले आहे.

असे आहे आजचे डुडल

बालदिनानिमित्त एक खास डुडल तयार करण्यात आले आहे. या डुडलमध्ये एक लहान जिज्ञासू चिमुरडी अवकाशातील ग्रह, तारे, अवकाश यान आणि आकाशगंगा या सर्वांचे निरीक्षण करताना दिसत आहे.


संबंधित बातम्या – 

वाचा – १४ नोव्हेंबर ऐवजी ‘या’ तारखेला होत होता बालदिन

वाचा – तबलावादक लच्छू महाराज यांना गुगल डुडलची सलामी

वाचा – गोविंदाप्पा व्यंकटस्वामींना गुगल डुडलचा सलाम

First Published on: November 14, 2018 2:37 PM
Exit mobile version