घरट्रेंडिंगतबलावादक लच्छू महाराज यांना गुगल डुडलची सलामी

तबलावादक लच्छू महाराज यांना गुगल डुडलची सलामी

Subscribe

सुप्रसिद्ध तबलावादक लच्छू महाराज यांच्या ७४ व्या जयंतीनिमित्त गुगलने डुडलच्या माध्यमातून त्यांना मानवंदना दिली आहे.

सुप्रसिद्ध तबलावादक लच्छू महाराज यांच्या ७४ व्या जयंतीनिमित्त गुगल डुडलने यांना मानवंदना दिली आहे. आज यांचे खास डुडल गुगलने ठेवले आहे. लच्छू महाराज यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथे १६ ऑक्टोबर १९४४ साली झाला होता. त्यांचे संपूर्ण नाव लक्ष्मी नारायण सिंग असून पुढे ते लच्छू महाराज या नावाने देशभरात ओळखू लागले. लच्छू महाराजांना बनारस घराण्यातील कुशल तबला वादक मानल जात होत. बनारस घराण हे तबला वादनातील सहा सर्वाधीक प्रचलित घराण्यांपैकी एक आहे. याचा शोध साधारणः २०० वर्षांपूर्वी लावण्यात आला होता.

पखवाज, तबला वादनात प्राविण्य 

लच्छू महाराज यांच्या वडिलांचे नाव वासुदेव महाराज होतं. लच्छू महाराज यांना बारा भाऊ-बहिण असून ते चौथे अपत्य होते. त्यांनी टीना नावाच्या एक फ्रांसच्या महिलेशी लग्न केलं होत. त्या दोघांना एक मुलगी देखील होती. लच्छू महाराज यांनी साधारण दहा वर्ष पंडित बिंदिदिन महाराज, त्यांचे काक आणि अवधचे नवाबच्या अदालती नर्तक यांच्याकडून संपूर्ण प्रशिक्षण घेतलं. त्यांनी पखवाज, तबला आणि हिंदुस्तानी शास्त्रीय स्वर संगीत यांचेही शिक्षण घेतले. त्यांनी लच्छू महाराज मुंबईत दाखल झाले. मुंबईत आल्यानंतर त्यांनी महल (१९४९), मुगल-ए-आजम (१९६०), छोटी छोटी बताना (१९६५), आणि पकीएजह (१९७२) सारख्या चित्रपटांमध्ये तबलावादन केले.

- Advertisement -

गायन, वादन, नृत्याचेही धडे घेतले

लच्छू महाराज यांनी त्यांच्या कठीम परिश्रमातून तबला वादन आणि संगत याच्यात प्राविण्य मिळवले. त्यांनी गायन, वादन आणि नृत्य या तिनही क्षेत्रात आपले स्थान बनवले. बॉलीवूडचे लोकप्रीय अभिनेता गोविंदा हे लच्छू महाराज यांचा भाचा असून त्यांनी लहानपणीच लच्छू महाराजांना आपला गुरू मानलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -