Live Update: राज्यात गेल्या २४ तासात ६९१० नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर १४७ रुग्णांचा मृत्यू

Live Update: राज्यात गेल्या २४ तासात ६९१० नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर १४७ रुग्णांचा मृत्यू
ऑक्सिजन अभावी कोरोना रुग्णाचा एकही मृत्यू नाही, केंद्र सरकारची राज्यसभेत स्पष्ट भूमिका (सविस्तर बातमीसाठी इथे क्लिक करा)
राज्यात गेल्या २४ तासात ६९१० नव्या कोरोना रुग्णांची नोंद तर १४७ रुग्णांचा मृत्यू (सविस्तर बातमीसाठी इथे क्लिक करा)
Mumbai Corona Update: मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांवर, गेल्या २४ तासात ३५१ कोरोनबाधितांची नोंद (सविस्तर बातमीसाठी इथे क्लिक करा)
उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करून ८ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यास शालेय शिक्षण विभागाच्या वतीने मान्यता देण्यात आली, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची महिती
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांनी पुण्यात बाबासाहेब पुरंदरेंची भेट घेतली आहे. बाबासाहेब पुरंदरेंची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस राज ठाकरे यांनी केली.
राज्यसभेचे कामकाज २२ जुलैपर्यंत तहकूब करण्यात आले
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा १५ सप्टेंबर ते ३१ डिसेंबदरम्यान होणार, तब्बल २ वर्षानंतर शिक्षक पात्रता परीक्षा होणार
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना ग्लोबल रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दिल्लीत गेल्या २४ तासांत ४४ नव्या रुग्णांची वाढ झाली असून ५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ३७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
पॉर्न फिल्मप्रकरणी राज कुंद्रा आणि रायन जाँर्न यांना २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनवाण्यात आली आहे.
मुंबईत १ ऑगस्टपासून घरोघरी लसीकरण सुरू होणार आहे. मुंबई महापालिकेकडून ७५ वर्षांवरील नागरिकांना विशेष मोहिम सुरू केली जात आहे.
पॉर्न फिल्मप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला किला कोर्टात हजर केलं आहे.
पुन्हा राज्यसभा विरोधकांच्या गदारोळमुळे १ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
राज्यसभेत पुन्हा विरोधकांचा गदारोळ सुरू
विरोधकांच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभा दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
संसदीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विरोधकांचा गोंधळ झाला. त्यामुळे लोकसभेचं कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.
लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे.
देशात गेल्या २४ तासांत ३० हजार ९३ नवे कोरोनाबाधित आढळले असून ३७४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ४५ हजार २५४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
संसदीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. या दुसऱ्या दिवशीही संसदेत रणकंदन होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षाची १०.३० वाजता सीपीपी कार्यालयात बैठक होणार आहे.
माजी खासदार राजू शेट्टी यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही राजू शेट्टी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. आता दुसऱ्या लाटेतही ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असून होम क्वारंटाईन करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
जगभरात अजूनही कोरोनाचा कहर कायम आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १९ कोटी १७ लाख १२ हजारवर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत ४१ लाख १२ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर १७ कोटी ४५ लाख ५६ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.
आज पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल- रखुमाई यांची शासकीय महापूजा संपन्न झाली. यंदा मुख्यमंत्र्यांसोबत महापूजा करण्याचा मान कोलते दाम्पत्याला मिळाला. मोजके वारकरी, पुजाऱ्यांच्या उपस्थितीत महापूजा पार पडली. सविस्तर वाचा 
First Published on: July 20, 2021 8:27 AM
Exit mobile version