Thursday, July 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE Mumbai Corona Update: मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांवर, गेल्या...

Mumbai Corona Update: मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांवर, गेल्या २४ तासात ३५१ कोरोनबाधितांची नोंद

मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख ३१ हजार ९१४ कोरोनाबाधिांची नोंद

Related Story

- Advertisement -

मुंबईतील कोरोना परिस्थिती हळूहळू आटोक्यात येत आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्यामुळे कोरोनाप प्रादुर्भाव आटोक्यात आला असल्याचे दिसत आहे. तसेच मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर एकूण ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत मागील २४ तासात १० रुग्णांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने संयुक्तपणे उपाययोजना केल्यामुळे सध्याची परिस्थिती सुधारली आहे. मुंबईत सध्या ६ हजार १६१ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. मागील काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांचा मृत्यू होण्याचा आकडा कमी असल्याचे आढळले आहे.

मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख ३१ हजार ९१४ कोरोनाबाधिांची नोंद झाली आहे. यामध्ये आतापर्यंत ७ लाख ७ हजार ६५४ कोरोनाबाधितांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या ६ हजार १६१ रुग्णांवर उपचार सुरु आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण १५ हजार ७२६ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांची शोध घेण्यासाठी कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. मागील २४ तासात २२ हजार १५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यानुसार आतापर्यंत ७८ लाख ११ हजार ७४८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

मुंबईत मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ९ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. ६ रुग्ण पुरुष व ४ रुग्ण महिला होते. १ रुग्णांचे वय ४० वर्षा खाली होते. तर ६ रुग्णांचे वय ६० वर्षा वर होते. उर्वरित ३ रुग्ण ४० ते ६० वयोगटामधील होते. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्क्यांवर आला आहे. १३ जुलै ते १९ जुलै २०२१ पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.०६ टक्के झाला आहे. तर मुंबईतील कोरोना रुग्णांच्या दुप्पटीचा दर १०६३ दिवसांवर गेला आहे.

- Advertisement -