कोरोनामागील छूपा अजेंडा दाखवणारा व्हिडिओ होतोय व्हायरल

कोरोनामागील छूपा अजेंडा दाखवणारा व्हिडिओ होतोय व्हायरल

कोरोना व्हायरस

जगभरात कोरोना विषाणूने अक्षरश: कहर केला आहे. अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू देखील गेला आहे. मात्र, हा कोरोना विषाणू कुठून आला? या कोरोना विषाणू मागचे नेमके सत्य काय आहे? असे एक ना अनेक प्रश्न अनेकांना पडले आहेत. मात्र, याच दरम्यान, फेसबुक, यूट्यूब या सोशल मीडियावर कोरोना विषाणू संबंधात एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या साइटवरुन वारंवार काढला जात आहे. परंतु, नवीन युजर्स हा व्हिडीओ सारखा अपलोड करत असल्याचे समोर आले आहे.

काय आहे हा व्हिडीओ?

या व्हिडीओमध्ये कोरोना विषाणू संबंधित सत्य काय आहे? ते दाखवण्याचा दावा केला गेला आहे. या व्हिडीओचे नाव आहे ‘प्लॅनडेमिक- कोविड-19 छूपा अजेंडा दाखवणारा व्हिडीओ’ (Plandemic: The Hidden Agenda Behind Covid-19). हा व्हिडीओ कॅलिफोर्नियाच्या इलेव्हेट या कंपनीने बनवला आहे. ही कंपनी मिक्की विलिस नावाची महिला चालवत असल्याचे समोर आले आहे. त्यांनी असा दावा आहे की, हा व्हिडीओ कोरोना महामारीच्या विषयावर तयार करण्यात आला आहे.

दरम्यान, Politifact च्या रोपोर्टनुसार, सांगण्यात आले आहे की, ‘हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करुन तो सातत्याने डिलीट केला जात आहे. मात्र, अनेकांनी तो पाहिला देखील आहे’. याबाबत मिक्की यांनी सांगितले आहे की, ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेली एक डॉक्यूमेंट्री आहे. विशेष म्हणजे हा तयार करण्यात आलेला व्हिडीओ कॉन्सिपरेसी थेरीने बनवण्यात आला आहे. त्यामुळे या व्हिडीओचा वेग अधिक प्रमाणात आहे.

दरम्यान, या व्हिडीओत दाखवणारी माहिती खोटी असल्याचे बोले जात आहे. हा एकूण २६ मिनिटांचा व्हिडीओ असून हा व्हिडीओ या आठवड्यात लोकांच्या समोर आला होता. या व्हिडीओत सांगण्यात आले आहे की, ‘कोरोना व्हायरस नैसर्गिक नसून तो लॅबमध्ये बनवण्यात आला आहे. एवढच नाहीतर असे देखील सांगण्यात आले आहे की, मास्क लावल्यामुळे लोक अधिक आजारी पडत आहेत. त्याचप्रमाणे या व्हिडीओत असे देखील सांगण्यात आले आहे की, कोरोनाच्या बळींच्या संख्येत लपवालपवी देखील करण्यात आली आहे. तसेच usatoday.com च्या रिपोर्टनुसार या व्हिडीओत मास्क लावल्याने आजारपणात अधिक वाढ होत असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे आम्ही हा व्हिडीओ डिलीट केला आहे.


हेही वाचा – या देशात होतेय ‘कोरोना पार्टी’, लोक मुद्दाम होतात कोरोना पॉझिटिव्ह


 

First Published on: May 9, 2020 6:15 PM
Exit mobile version