घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटया देशात होतेय 'कोरोना पार्टी', लोक मुद्दाम होतात कोरोना पॉझिटिव्ह

या देशात होतेय ‘कोरोना पार्टी’, लोक मुद्दाम होतात कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

वॉशिंग्टनमधील वल्ला वल्ला काउंटी परिसरात कोरोना पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतो. या पार्टीत १०० जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

जगात कोरोना विषाणूचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अमेरिका असा देश आहे जिथे मोठ्या संख्येने लोक कोरोनामुळे मरण पावले आहेत. शनिवारी सकाळपर्यंत अमेरिकेत मृतांचा आकडा ७७ हजारांवर पोहोचला आहे. दरम्यान, अमेरिकेत लॉकडाऊनचं उल्लंघन केल्याच्या तसंच सोशल डिस्टंन्सिंगचे तान तेरा वाजवल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. तथापि, अनेक अमेरिकन अधिकारी ‘कोरोना पार्टी’ मुळे चिंतेत आहेत.

वॉशिंग्टनमधील वल्ला वल्ला काउंटी परिसरात कोरोना पार्टीमुळे १०० जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती वल्ला वल्ला काउंटीच्या अधिकाऱ्यांनी दिली. पार्टीतील लोकांनी मुद्दाम हा विषाणू पसरविला. याबाबतची बातमी एएफपी या वृत्तसंस्थेने दिली. वॉशिंग्टनचे आरोग्य सचिव जॉन वेझमन म्हणाले- कोरोना साथीच्या दरम्यान लोकांना एकत्र जमावणं धोकादायक आहे. यामुळे लोकांना संसर्ग होऊ शकतो आणि त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो. अमेरिकन अधिकाऱ्याने असंही म्हटलं आहे की कोरोनापासून बरे झालेले लोक बर्‍याच दिवसांपासून पुन्हा आजारी पडणार नाहीत, याविषयी अद्याप कोणतीही माहिती नाही. दीर्घकाळानंतर आपल्या शरीरावर विषाणूचा काय परिणाम होईल, हे देखील माहित नाही असंही वेझमन यांनी सांगितलं.

- Advertisement -

गेल्या महिन्यात अमेरिकेच्या शिकागोमध्ये एका पार्टीत सोशल डिस्टंन्सिगचे तीन तेरा वाजवल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पार्टीसाठी एकाच घरात शेकडो लोक जमले होते. या पार्टीत भाग घेणाऱ्या तरूणाने स्वत: व्हिडिओदेखील अपलोड केला आहे. कोरोना विषाणूच्या नावाखाली होणाऱ्या पार्ट्यांमध्ये ज्यांना संसर्ग नाही असे लोक पॉझिटिव्ह लोकांसमवेत बसतात जेणेकरुन त्यांनाही संसर्ग व्हावा. आरोग्य सचिव जॉन वेझमन यांचं म्हणणं आहे की अशा वागण्यामुळे रुग्णांची संख्या वाढेल आणि वॉशिंग्टनमधून लॉकडाऊन हटविण्यातही विलंब होईल.


हेही वाचा – भारतात जुलैच्या उत्तरार्धात कोरोनाचे रुग्ण वाढणार; WHO च्या अधिकाऱ्याचा दावा

- Advertisement -

वल्ला वाला काउंटीचे समुदाय आरोग्य संचालक मेघन डीबोल्ट म्हणतात की कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवरून असं दिसून आलं आहे की बरीच संक्रमित नसलेले लोक पॉझिटिव्ह होण्याच्या उद्देशाने पार्टीत सामील झाले होते. ते म्हणाले, “ही पार्टी कधी झाली हे आम्हाला ठाऊक नाही. प्रकरण उघडकीस आल्यानंतर आम्हाला माहिती मिळाली.”

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -