25 वर्ष घरकाम केल्याचा घटस्फोटीत पतीकडून मिळाला मोबदला, स्पेन न्यायालयाचा आदेश

स्पेनमधील एका न्यायालयाने घटस्फोटाच्या प्रकरणात एका पुरुषाला त्याच्या घटस्फोटीत पत्नीला 2,00,000 युरो (दोन लाख युरो म्हणजे सुमारे 1.79 कोटी रुपये) देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने घटस्फोटीत पत्नीला 25 वर्षांपासून घरात केलेल्या कामांचा मोबदला म्हणून ही रक्कम देण्यास सांगितले आहे. न्यायालयाने किमान वेतनाच्या आधारावर महिलेच्या कामाची गणना केली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

स्पेनमधील एका जोडप्याचा 25 वर्षे एकत्र राहिल्यानंतर घटस्फोट झाला. त्यांना दोन मुली आहेत. घटस्फोटानंतर दोघांमध्ये मालमत्तेवरून वाद सुरू झाला. यावेळी पतीच्या मते विवाहित असताना त्याने जे काही कमावले त्यावर केवळ त्याचाच अधिकार आहे. त्यामुळे पत्नीचा त्यावर अधिकार नाही. मात्र, त्यावेळी पत्नीच्या वकीलाने सांगितले की, लग्न झाल्यानंतर पत्नीने स्वतःला घरातील कामात झोकून दिले होते, म्हणजे पत्नीने घर आणि संपूर्ण कुटुंबाची काळजी घेतली.

महिलने सांगितले की, लग्नानंतर पतीला त्याच्या पत्नीने घराबाहेर पडून नोकरी करावी असे वाटत नव्हते. मात्र, त्याने तिला स्वतःच्या जीममध्ये काम करण्याची परवाणगी दिली. जिथे तिने रिसेप्शनिस्टचे काम केले. तसेच घरातील अनेक कामं आणि जबाबदाऱ्या देखील ती सांभाळत होती. परंतु तिला या कामांचा पतीने कधीही मोबदला दिला नाही.

त्यामुळे आता घटस्फोटानंतर कोर्टाने कायदेशीर कागदपत्रांमध्ये पाहिले की लग्नानंतर म्हणजेच जून 1995 ते डिसेंबर 2020 दरम्यान महिलेने किती कमाई केली आणि त्यानुसार आता स्पेनच्या न्यायालयाने पतीला त्याच्या घटस्फोटीत पत्नीला 25 वर्षातील कामाचा मोबदला म्हणून 1.79 कोटी देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दोन मुलींना मासिक बालसंगोपन भत्ता देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.


हेही वाचा :

बांगलादेश पुन्हा हादरला; इमारतीमधील बॉम्बस्फोटात १४ ठार

First Published on: March 8, 2023 10:53 AM
Exit mobile version