घरदेश-विदेशबांगलादेश पुन्हा हादरला; इमारतीमधील बॉम्बस्फोटात १४ ठार

बांगलादेश पुन्हा हादरला; इमारतीमधील बॉम्बस्फोटात १४ ठार

Subscribe

गुलिस्तान भागात एक सात इमारत आहे. तेथे दुपारी चारच्या सुमारास हा बॉम्बस्फोट झाला. तळमजल्यावर हा बॉम्बस्फोट झाल्याने इमारतीला मोठा हादरा बसला. हा बॉम्बस्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्फोटाचा आवाज जोराने झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.

ढाकाः बांगला देशची राजधानी ढाका येथे इमारतीत झालेल्या बॉम्बस्फोटात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर शंभरहून अधिकजण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्याच आठवड्यात येथील ऑक्सिजन प्रकल्पात झालेल्या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता.

गुलिस्तान भागात एक सात इमारत आहे. तेथे दुपारी चारच्या सुमारास हा बॉम्बस्फोट झाला. तळमजल्यावर हा बॉम्बस्फोट झाल्याने इमारतीला मोठा हादरा बसला. हा बॉम्बस्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्फोटाचा आवाज जोराने झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. आपत्ती निवारण पथक व पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मदत आणि बचाव कार्य तातडीने सुरु करण्यात आले. जखमींना ढाका वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

- Advertisement -

बॉम्बस्फोट झालेल्या इमारतीत सॅनिटरी उत्पादनांची अनेक दुकाने आहेत आणि शेजारीच बीआरएसी बॅंकेची शाखा आहे. या बॉम्बस्फोटात बॅंकेच्या काचेच्या भिंतींचा चक्काचूर झाला. स्फोट झाला तेव्हा तेथे बस होती. त्या बसचेही नुकसान झाले.

दरम्यान, ४ मार्च २०२३ रोजी बांगलादेशातील चितगाँग शहरातील सीताकुंड उपजिल्हामधील कदमरसूल (केशबपूर) भागात ऑक्सिजन प्रकल्पात झालेल्या भीषण स्फोटात सहा जण ठार झाले तर 30 हून अधिक जखमी झाले. ऑक्सिजन प्रकल्पात स्फोटाचा प्रभाव इतका होता की दोन चौरस किलोमीटरच्या परिघात इमारतींना हादरा बसला आणि प्रकल्पातील विविध वस्तू प्रकल्पापासून कित्येक किलोमीटर दूर जाऊन पडल्याचे स्थानिकांनी सांगितले.

- Advertisement -

ऑक्सिजन प्रकल्पातील स्फोट इतका भीषण होता की प्रकल्पातमध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर स्फोटापासून एक किलोमीटर अंतरावर कदम रसूल बाजार येथे आपल्या दुकानात बसलेल्या ६५ वर्षीय शमशुल आलम यांच्या अंगावर धातूची वस्तू पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. स्फोटानंतर सुमारे 250-300 किलो वजनाची धातूची वस्तू त्याच्या अंगावर पडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे आलमचा भाऊ मौलाना ओबेदुल मुस्तफा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

मदमबीर हाटमधील रहिवासी रदवानुल हक यांनी सांगितले होते की, ऑक्सीजन प्रकल्पातील स्फोटानंतर कदमरसुल परिसरातून धुराचे लोट उठताना दिसले आणि प्रकल्पामधून 12 कामगारांना बाहेर काढताना पाहिले. तसेच जवळच्या तयार कपड्यांच्या कारखान्यातील एका कामगाराने सांगितले होते की, त्याने कारखान्यातील खिडक्यांच्या काचा फुटल्याचा आवाज ऐकला. काचेचा तुकडा त्याच्या अंगावर पडल्याने त्यांना दुखापत झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -