माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग राज्यसभेवर बिनविरोध

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग राज्यसभेवर बिनविरोध

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. डॉ. मनमोहन सिंग हे राज्यस्थानमधून निवडून गेले आहेत. या जागेसाठी एकमेव अर्ज सादर झाल्याने उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपताच डॉ. मनमोहन सिंग यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी डॉ. मनमोहन सिंग यांचे अभिनंदन केले. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरूनसुद्धा डॉ. मनमोहन सिंग यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

काँग्रेसने दिल्या शुभेच्छा

राजस्थानची राज्यसभेतील एक जागा रिकामी झाली होती. या जागेसाठी डॉ. मनमोहन सिंग यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावेळी डॉ. मनमोहसिंग यांच्या सन्मानार्थ भाजपने त्यांच्याविरोधात लढत न देण्याचे निश्चित केल्याचे राजस्थानच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेता गुलाबचंद कटारिया यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करत सांगितले. त्यामुळेच डॉ. मनमोहन सिंग यांची बिनविरोध निवड होणार हे जवळपास निश्चित झाले होते. आज औपचारिकपणे डॉ. मनमोहन सिंग यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. दरम्यान राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी डॉ. मनमोहन सिंग यांचे अभिनंदन केले. यावेळी डॉ. मनमोहन सिंग यांची निवड राज्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे मत गेहलोत यांनी मांडले. काँग्रेसच्या ट्विटर हॅन्डलवरूनदेखील डॉ. मनमोहन सिंग यांना शुभेच्छा देण्यात आल्या. काँग्रेसकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये डॉ. मनमोहन सिंग यांना प्रचंड अनुभव असून त्यांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा सभागृहाला निश्चितच फायदा होईल, असे म्हटले आहे.

हेही वाचा – ‘काँग्रेसने केवळ मुस्लीम तुष्टीकरणाचे राजकारण केलंय’

First Published on: August 19, 2019 6:31 PM
Exit mobile version