घरदेश-विदेश'काँग्रेसने केवळ मुस्लीम तुष्टीकरणाचे राजकारण केलंय'

‘काँग्रेसने केवळ मुस्लीम तुष्टीकरणाचे राजकारण केलंय’

Subscribe

काँग्रेसच्या तुष्टिकरणाच्या राजकारणामुळे तीन तलाक सारख्या कुप्रथेस आपल्या देशातून हटवण्यासाठी ५६ वर्षे लागली, असा आरोप अमित शहा यांनी केला.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून काँग्रेसने केवळ मुस्लीम तुष्टीकरणाचे राजकारण केले. काँग्रेसच्या तुष्टिकरणाच्या राजकारणामुळे तीन तलाक सारख्या कुप्रथेस आपल्या देशातून हटवण्यासाठी ५६ वर्षे लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुष्टीकरणाचे राजकारण संपवले असून तीन तलाक प्रथा बंद केल्याने मुस्लीम महिलांना त्यांचा हक्कच मिळाला आहे, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. देशात तिहेरी तलाक ही कुप्रथा होती, यात काहीच संशय नाही. तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाल्यानंतर मुस्लिम महिलांना त्यांचा अधिकार मिळाला आहे. १६ मुस्लिम देशात तिहेरी तलाकला ‘तलाक’ देण्यात आला आहे. भारतात हे ऐतिहासिक काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या ऐतिहासिक कामामुळे नरेंद्र मोदी यांची समाज सुधारकांच्या यादीत नोंद केली जाईल, असेही अमित शहा यांनी सांगितले.

- Advertisement -

काय म्हणाले अमित शहा

जे राजकारण ६० च्या दशकानंतर काँग्रेसने सुरू केले तसेच अन्य पक्षांनी देखील त्याचे अनुकरण केले. त्याचा परिणाम देशाच्या लोकशाही, समाजीक जीवन आणि गरिबांच्या उत्थानावर झाला आहे. जे मागासलेले आहेत, जे समाजातील वंचित आहेत मग ते कोणत्याही धर्माचे असतील, त्यांना वर आणले पाहिजे. आपोआपच समाज सर्वस्पर्शी व सर्वसमावेशकतेच्या मार्गावर चालेल. कोणत्याही तुष्टीकरणाशिवाय सरकाराने सर्वांचा विकास करत व सर्वसमावेशक राहत पाच वर्षे पूर्ण केली. यामुळेच देशातील कोट्यावधी जनतेने सरकारवर पुन्हा एका विश्वास टाकत, देशाला तुष्टीकरणापासून मुक्त करण्यासाठी २०१९ मध्ये बहुमत दिले. तसेच २३ एप्रिल १९८५ रोजी सुप्रीम कोर्टाने शाह बानोच्या बाजूने निर्णय दिला होता. कोर्टाने तीन तलाकला समाप्त करत म्हटले होते की, पत्नीला खर्च देणे अनिवार्य आहे आणि तलाकसाठी एक कारण द्यायला हवे. मात्र राजीव गांधी यांनी परंपरावादी मुस्लीमांच्या दबावात आणि मतांसाठी कोर्टाचा निर्णय उलटवला होता. तसेच, त्यांनी हे देखील म्हटले की, आजही काँग्रेसला काहीच वाटत नाही, ते सांगतात की आम्ही तीन तलाकच्या बाजूने आहोत व ही प्रथा कायम रहावी. मात्र यामागचे कारण ते सांगत नाहीत. केवळ विरोध करायचा म्हणून त्यांनी हा पवित्रा घेतला आहे, जेणेकरून त्यांची व्होट बँक शाबूत रहावी, असा आरोप त्यांनी काँग्रेसवर केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -