गौतम अदानी जगातील चौथे श्रीमंत व्यक्ती; अंबानी आणि बिल गेट्स यांनाही टाकलं मागे

गौतम अदानी जगातील चौथे श्रीमंत व्यक्ती; अंबानी आणि बिल गेट्स यांनाही टाकलं मागे

जगातील श्रीमंत व्यक्तींची यादी काढायची झालीच तर अंबानी किंवा बिल गेट्स(bill gates) यांच्या यासारख्या काही मंडळींची नावं पटकन आठवतात. पण आता ही दोन नाव सुद्धा श्रीमंतांच्या यादीतून काही प्रमाणात मागे झाली आहेत. फोर्ब्सने जगातील श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीत जगातील नामांकित श्रीमंत व्यक्ती यांनी त्यांच्या संपत्तीची आकडेवारी देण्यात आली आहे.

हे ही वाचा – खाद्यपदार्थांवर जीएसटी, सोशल मीडियावर मिम्सना उधाण

या यादीत नमुद केल्या प्रमाणे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी(gautam adani) हे मायक्रोसॉफ्टचे सह- संस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकत जगातील श्रीमंत व्यक्ती म्हणून चौथ्या स्थानावर विराजमान झाले आहेत. ११५. ५ अब्ज डॉलर पर्यंत त्यांची संपत्ती पोहोचली आहे. तर बिल गेट्स यांची संपत्ती १०४. ६ अब्ज डॉलर एवढी आहे. तर भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी(mukesh ambani) हे या यादीत दहाव्या क्रमांकावर आहेत. मुकेश अंबानी यांची संपत्ती ९० अब्ज डॉलर आहे. तर एलॉन मस्क हे २३५. ८ अब्ज डॉलर्ससह पहिल्या स्थानावर विराजमान आहेत.

हे ही वाचा – रुपयाची ऐतिहासिक घसरण, डॉलरच्या तुलनेत ८० रुपयांच्या निचांकी पातळीवर

मागील दोन वर्षांत अदानी(adani group) समूहाचे काही शेअर्स हे ६०० टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. अदानी समूहाने केवळ तीन वर्षांमध्ये सात विमानतळांवर आणि भारतातील सुमारे एक चतुर्थांश हवाई वाहतुकीवर स्वतःचे नियंत्रण मिळविले आहे. अदानी समूहाकडे भारतातील सर्वात मोठे विमानतळ ऑपरेटर, पॉवर जनरेटर आणि त्याचसोबत बिगर – राज्य क्षेत्रातील सिटी गॅस रिटेलर आहे. याचसोबत अदानी इंटरप्राइझ लिमिटेडने २६ जुलै रोजी ५G स्पेक्ट्रमच्या लिलावात सहभागी होण्यासाठी अर्ज सुद्धा केला होता.

हे ही वाचा –   भाजपा सर्वत्र सरकार पाडण्यात मग्न, ममता बॅनर्जींची टीका

First Published on: July 21, 2022 6:18 PM
Exit mobile version