Gujarat : कच्छजवळच्या खाडीत 9 पाकिस्तानी बोटी जप्त, BSF मच्छीमारांच्या शोधात

Gujarat : कच्छजवळच्या खाडीत 9 पाकिस्तानी बोटी जप्त, BSF मच्छीमारांच्या शोधात

Gujarat : कच्छजवळच्या खाडीत 9 पाकिस्तानी बोटी जप्त, BSF मच्छीमारांच्या शोधात

सीमा सुरक्षा बल म्हणजेच (Border Security Force) यांनी गुरुवारी सकाळी गुजरातमधील कच्छ जिल्ह्याजवळील भारत-पाकिस्तान सागरी सीमेवर हरामी नाला खाडी परिसरात 9 पाकिस्तानी मासेमारी नौका ताब्यात घेतल्या. याबाबतची माहिती BSF अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. या नौका जप्त केल्यानंंतर शेजारील देशाच्या अशा आणखी काही नौका भारतीय पाण्यात घुसल्या आहेत का हे शोधण्यासाठी आखाती प्रदेशात BSF च्या जवानांनी शोध मोहीम सुरू केली आहे.

बीएसएफचे गुजरात फ्रंटियर इंस्पेक्टर जनरल जीएस मलिक यांनी पीटीआयला सांगितले की, नियमित टेहाळणी दरम्यान, बीएसएफच्या जवानांनी परिसराचे संपूर्ण दृश्य पाहण्यासाठी कॅमेरा-सुसज्ज यूएव्ही (मानवरहित वाहने किंवा ड्रोन) आकाशात पाठवले होते. यूएव्हीच्या माध्यमातून हरामी नाला परिसरात 9 मासेमारी नौका दिसण्यात आल्या. बीएसएफच्या गस्त घालत असलेल्या नौका तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी पाकिस्तानी मच्छिमारांच्या बोटी ताब्यात घेतल्या. एकाही पाकिस्तानी मच्छिमाराला पकडण्यात अद्यापही यश आले नाही. कारण, त्या बोटीवरील मच्छीमार ‘BSF’ ची माहिती कळताच मच्छिमार पाकिस्तानच्या दिशेने पळून गेले.

मलिक म्हणाले की, या पाकीस्तानी नौका सापडल्यानंतर खाडी परिसरात शोध मोहिमेवर वैयक्तिकरित्या देखरेख करण्यासाठी ते गांधीनगरहून कच्छला पोहोचले आहेत. बीएसएफ गुजरातने सांगितले की, भारतीय वायुसेनेच्या तीन कमांडो गटांना 3 वेगवेगळ्या दिशांनी एअरड्रॉप करण्यात आले आहे, जिथे पाकिस्तानी लपले आहेत, कमांडो तिथे पोहोचले असून, बीएसएफने सांगितले की, अत्यंत दलदलीचा प्रदेश, खारफुटी आणि भरतीचे पाणी यामुळे सैनिकांची शोध मोहिम आव्हानात्मक झाली आहे.


हे ही वाचा – कोरोना संपल्याशिवाय मास्कमुक्ती नाही, अजित पवारांचे सूचक वक्तव्य


 

First Published on: February 11, 2022 10:36 AM
Exit mobile version